Fares Arnaout in FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवा संघात सीरियन बचावपटू

फारेस अरनौत याच्याशी करार, 25 वर्षीय खेळाडूपाशी आंतरारष्ट्रीय अनुभव

किशोर पेटकर

पणजी : एफसी गोवा संघाने बचावफळीत सीरियाचा बचावपटू फारेस अरनौत याच्याशी एका वर्षाचा करार केला. सेंटर-बॅक जागी खेळणाऱ्या २५ वर्षीय खेळाडूने आपल्या देशाचे दहा आंतरारष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

अरनौत हा एएफसी कप विजेता खेळाडूही आहे. स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ आणि गोलरक्षक अर्शदीप सिंग यांच्यानंतर अरनौत हा एफसी गोवा संघातील तिसरा नवा, तर दुसरा परदेशी फुटबॉलपटू आहे.

अरनौत यापूर्वी 2019 मध्ये भारतात खेळला होता. तेव्हा झालेल्या इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धेत तो सीरिया संघात होता. त्या स्पर्धेत सीरिया व भारत यांच्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला होता. ‘‘भारतात येऊन एफसी गोवातर्फे खेळणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे, त्याचवेळी येथे खेळण्याची भावना रोमांचित करणारी आहे,’’ अशी प्रतिक्रिया अरनौत याने शुक्रवारी दिली.

भक्कम शैलीचा खेळाडू

‘‘फारेस याला संघात सामावून घेताना आनंद होत आहे. तो आमच्या संघातील आशियाई खेळाडू आहे. चेंडूवर आरामात वर्चस्व राखत तो भक्कमपणे खेळतो, आमच्या इतर फुटबॉल खेळाडूंच्या कौशल्यास तो आदर्शवत आणि पूरक आहे. त्याने आपल्या देशाचे सीनियर पातळीवर प्रतिनिधित्व केले असून आंतरखंडीय पातळीवर हल्लीच्या काळात यश मिळविले आहे. त्यामुळेच त्याला करारबद्ध करण्याचा निर्णय सोपा ठरला,’’ असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले.

बचावपटूची लक्षवेधक कारकीर्द

सीरियातील दमासकस येथील अल जैश स्पोर्टस क्लबतर्फे (आर्मी) खेळताना अरनौत याने 2017-18 मोसमात सीरियन कप, सीरियन प्रीमियर लीग, सीरियन सुपर कप जिंकला. 2018-19 मध्ये सीरियन लीग जिंकलेल्या याच संघाचा सदस्य होता. अल जैशतर्फे तो एएफसी कप स्पर्धेत तीन मोसम आणि 15 सामने खेळला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने बहरीनच्या अल मुहार्रक संघाशी करार केला. त्या वर्षी या संघाने एएफसी कप विजेतेपद मिळवले.

अरनौत 2021-22 मोसमात बहरीन येथील मनामा क्लबचा सदस्य होता. 2019 मध्ये भारतात झालेल्या इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धेत त्याने सीरियाच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. जून 2021 मध्ये तो अरब कप स्पर्धेत सीरियाकडून शेवटच्या वेळेस खेळला. अरनौतने सीरियाच्या 23 वर्षांखालील संघाचेही नेतृत्व केले तेव्हा 2020 मध्ये संघाने एएफसी 23 वर्षांखालील स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT