Swimmer Sajan Prakash Dainiik Gomantak
क्रीडा

National Games 2023 Goa: जलतरणात साजनचा विक्रमी धडाका

National Games 2023 Goa: ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत कर्नाटकच्या संघाने दोन्ही गटात स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

गोमन्तक डिजिटल टीम

National Games 2023 Goa: केरळचा ऑलिंपियन जलतरणपटू साजन प्रकाश याने बुधवारी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांपाल जलतरण तलावात विक्रमी धडाका राखला. त्याने पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत नवा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला.

२०१५ आणि २०२२ मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिळून एकूण १७ पदके जिंकलेल्या तीस वर्षीय साजनने आपलाच विक्रम मोडला. त्याने सुवर्णपदक जिंकताना १ मिनिट ५९.३८ सेकंद वेळ नोंदविली. त्याने गतवर्षी नोंदविलेला आपलाच १ मिनिट ५९.५६ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला.

४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत 01कर्नाटकच्या संघाने दोन्ही गटात स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

अनीश गौडा, शिवांक विश्वनाथ, शोआन गांगुली, श्रीहरी नटराज यांच्या संघाने ७ मिनिटे ३७.४७ सेकंद वेळ नोंदविली, तर हशिका रामचंद्र, श्रीचरणी तुमू, शिरीन व धिनिदी देसिंघू यांच्या संघाने ८ मिनिटे ४९.७४ सेकंद वेळ नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT