swimmer  Dainik Gomantak
क्रीडा

Swimming Game Panaji : खाडे दाम्पत्य बनले वेगवान जलतरणपटू

आगळा पराक्रम ः वीरधवल, ऋतुजाला सुवर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Swimming Game Panaji : पणजी, ऑलिंपियन जलतरणपटू वीरधवल खाडे व त्याची पत्नी ऋतुजा खाडे यांनी मंगळवारी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणात आगळा पराक्रम साधला.

दोघांनीही ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना स्पर्धेतील वेगवान जलतरणपटूचा मान मिळविला.

कांपाल येथील जलतरण तलावात मंगळवारी महाराष्ट्राच्या वीरधवल याने २२.८२ सेकंद वेळ नोंदविली आणि आपलाचा विक्रम मोडला.

वीरधवल याने २०१५ मध्ये केरळमधील ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये २३.०० सेकंद वेळ नोंदविली होती. ऋतुजाने महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये २६.४२ सेकंद वेळेसह महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

तिने गतवर्षी ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्याच अवंतिका चव्हाण हिने नोंदविलेला २६.५४ सेकंदाचा विक्रम मोडला.

महिलांच्या २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये महाराष्ट्राच्या पलक जोशी (२ मिनिटे, २२.१२ सेकंद) हिने सुवर्णपदक प्राप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT