shrungi bandekar Swimmer Dainik Gomantak
क्रीडा

Swimming Medal : ‘घरचे’ हे पदक खूपच छान : श्रुंगी बांदेकर

सलग दुसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरणात छाप

गोमन्तक डिजिटल टीम

Swimming Medal : पणजी, गोव्यातील ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘घरची’ असल्याने या ठिकाणी जिंकलेल्या पदकाची भावना खूपच छान आहे. आणखी वैयक्तिक जलतरण प्रकार शिल्लक असल्याने पदकांच्या हॅटट्रिकचे लक्ष्य बाळगले आहे, असे गोव्याची आघाडीची महिला जलतरणपटू श्रुंगी बांदेकर हिने मंगळवारी सांगितले.

कांपाल येथील जलतरण तलावावर झालेल्या स्पर्धेत तिने महिलांच्या ४०० मीटर मेडली शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.गतवर्षी गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बंगळूरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या श्रुंगी हिने पाच प्रकारात भाग घेतला होता.

सर्व शर्यतीत तिने अंतिम फेरी गाठली, मात्र पदक तिला २०० मीटर मेडलीत मिळाले. तिने २८.६४ सेकंद वेळेसह ब्राँझपदक पटकावले. श्रुंगीचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक ठरले होते.

मंगळवारी तिने ४०० मीटर मेडली शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविताना सलग दुसऱ्या स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम साधला. श्रुंगीने सातव्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेली चाळीस वर्षीय अनुभवी मध्य प्रदेशची रिचा मिश्रा हिला चौथ्या क्रमांकावर ढकलले.

‘‘कोविडच्या लॉकडाऊन काळात राज्यात जलतरण सुविधा बंद होत्या. मी चांगली प्रशिक्षण व्यवस्था व प्रशिक्षकाच्या शोधात होते, त्यामुळे बंगळूरला मोर्चा हलविला. तेथे मी भूषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते व त्याचा खूप फायदा झालेला आहे.

आता ‘होमटाऊन’मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकाची अपेक्षापूर्ती केल्यामुळे आनंदित आहे,’’ असे श्रुंगी मंगळवारी पदक जिंकल्यानंतर म्हणाली. ती बंगळूरमध्ये जैन विद्यापीठात शिकते. यावर्षी ऑगस्टमध्ये चीनमधील चेंगडू येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत श्रुंगीने भारतीय जलतरण संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

श्रुंगीचे सातत्यपूर्ण यशस्वी जलतरण

श्रुंगीसाठी २०२३ वर्ष सफल ठरले आहे. उत्तर प्रदेशमधील खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत तिने ५ सुवर्ण व ४ रौप्यसह एकूण ९ पदके जिंकून सर्वोत्तम जलतरणपटूचा मान मिळविला.

हैदराबाद येथे झालेल्या जुलैमध्ये झालेल्या ७६व्या सीनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रुंगीने २ ब्राँझपदके जिंकली. २०० मीटर मेडली व ४०० मीटर मेडली शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला.

श्रुंगीने २०२२ साली गुवाहाटी येथे झालेल्या ७५व्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत ४०० मीटर मेडलीत रौप्यपदक जिंकले होते, शिवाय गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले.

२०२२ मध्येच बंगळूर येथे झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत ४ सुवर्ण, १ रौप्य व ३ ब्राँझ अशी एकूण ८ पदके जिंकली होती.

शर्यतीतील कामगिरीवर मी खूष आहे. मी सर्वोत्तम कामगिरीसाठी पूर्ण लक्ष शर्यतीवर केंद्रित केले होते, त्यामुळे सुरवातीला मी आघाडीवर असल्याचे ध्यानात आले नाही. मी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवू शकले याबद्दलही आनंदित आहे.’

- संजना प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT