Legends League Cricket | Swapnil Asnodkar Dainik Gomantak
क्रीडा

Legends League Cricket : स्वप्नील ठरला लिजंड्स लीगमध्ये खेळणारा पहिला गोमंतकीय

हरभजनच्या नेतृत्वाखालील मणिपाल टायगर्स संघात निवड

किशोर पेटकर

Legends League Cricket : गोव्याचा सर्वाधिक रणजी धावा करणारा माजी कर्णधार स्वप्नील अस्नोडकर आगामी लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत झळकणार आहे. माजी कसोटीपटू हजभजन सिंग याच्या नेतृत्वाखालील मणिपाल टायगर्स संघात स्वप्नीलची निवड झाली.

लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा यंदा दुसरा मोसम आहे. स्पर्धा 16 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत कोलकाता, दिल्ली, लखनौ, जोधपूर आणि कटक येथे खेळली जाईल. इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील भिलवाडा किंग्ज, वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स, गौतम गंभीर याच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्स हे स्पर्धेतील अन्य संघ आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन मणिपाल टायगर्स संघाचे प्रशिक्षक आहेत.

लिजंड्स लीग स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला स्वप्नील हा पहिला गोमंतकीय क्रिकेटपटू आहे. मणिपाल टायगर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुपिंदर सिंग यांनी स्वप्नीलला संघ निवडीचे पत्र दिले, तो बुधवारी (14 सप्टेंबर) कोलकाता येथे संघाच्या सराव शिबिरात दाखल होईल.

स्पर्धेत खेळण्याच्या संधीसाठी परवानगी दिल्याबद्दल स्वप्नीलने गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) आणि सचिव विपुल फडके यांचे आभार मानले आहेत.

गोव्याचा यशस्वी क्रिकेटपटू

स्वप्नील सध्या 38 वर्षांचा आहे. 2001-02 ते 2017-18 या कालावधीत हा सलामीचा फलंदाज गोव्यातर्फे 84 रणजी क्रिकेट सामने खेळला. त्याने 14 शतकांसह गोव्यातर्फे रणजी स्पर्धेत सर्वाधिक 5731 धावा केल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत स्वप्नीलने 4 दुलिप करंडक सामन्यांसह एकूण 88 सामन्यांत 40.02 च्या सरासरीने 5883 धावा नोंदविल्या आहेत. यामध्ये 14 शतके व 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

गोव्याचा पहिला आयपीएल स्टार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम खेळणारा गोमंतकीय हा मान स्वप्नील अस्नोडकरकडे जातो. स्वप्नील 2008 ते 2011 या कालावधीत आयपीएल खेळला. राजस्थान रॉयल्सतर्फे स्वप्नीलने २० आयपीएल सामन्यांत दोन अर्धशतकांसह 423 धावा केल्या. 2008 मध्ये आयपीएल जिंकलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा तो सदस्य होता. याशिवाय तो 2008-09 मोसमात भारत `अ` संघातर्फे इस्त्राईल आणि हैदराबाद येथे झालेल्या क्रिकेट मालिकेत खेळला होता.

मणिपाल टायगर्स संघातील प्रमुख खेळाडू

हरभजन याच्याव्यतिरिक्त ब्रेट ली, अँड्र्यू फ्लिंटॉफ, व्हीआरव्ही सिंग, परविंदर अवाना, रीतिंदर सोधी, रोमेश कालुविथरणा, दिमित्री मस्कारेन्हास, लान्स क्लुसनर, रायन साईडबॉटम, महंमद कैफ, फिल मस्टार्ड, मुथय्या मुरलीधरन, डॅरेन सॅमी, इम्रान ताहीर, कोरे अँडरसन हे मणिपाल टायगर्स संघातील प्रमुख खेळाडू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT