World Table Tennis | Sutirtha  Dainik Gomantak
क्रीडा

World Table Tennis: सुतिर्थाची एकेरीत स्वप्नवत आगेकूच

फ्रेंच खेळाडूस नमवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

किशोर पेटकर

World Table Tennis Star Contender: पात्रता फेरीचा अडथळा पार करून वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल झालेल्या सुतिर्था मुखर्जी हिने महिला एकेरीत स्वप्नवत आगेकूच राखली. जागतिक मानांकनातील १८ व्या क्रमांकावरील फ्रान्सच्या जिया नॅन युआन हिला नमवून तिने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी भारतीय जोड्या दुहेरीत कूच करू शकल्या नाही. पुरुष गटातील एकेरीत अनुभवी साथियन ज्ञानशेखरन याला जपानचा २१ वर्षीय युकिया उदा भारी ठरला.

मात्र सुतिर्थाने यजमानांच्या आशा कायम राखल्या. पात्रता फेरीसह तिने आता सलग पाच सामने जिंकले आहेत. पुढील फेरीत सुतिर्थासमोर जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या पोर्तुगालच्या ४४ वर्षीय फू यू हिेचे आव्हान असेल.

कोलकात्यातील २७ वर्षीय सुतिर्थाने ३-० असा सहजसुंदर विजय प्राप्त केला. ३७ वर्षीय प्रतिस्पर्धीवर तिने ११-७, ११-८, ११-७ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत १४७व्या स्थानी असलेली सुतिर्था २०१८ साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारताच्या महिला संघाची सदस्य होती.

राष्ट्रीय विजेतेपद मिळविलेल्या या खेळाडूने टोकियो ऑलिंपिकमध्येही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. राऊंड ऑफ ६४ फेरीत देशवासीय सुहाना सैनी हिला नमविलेल्या सुतिर्थाने आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असलेली अनुभवी फ्रेंच खेळाडू वर्चस्व राखणार नाही याची दक्षता घेतली.

सुतिर्थाला महिला दुहेरीत मात्र आगेकूच राखता आली नाही. सकाळच्या सत्रात तिला अहिका मुखर्जी हिच्या साथीत स्विडीश जोडी लिंडा बर्गस्ट्रोम व ख्रिस्तिना कॅलबर्ग यांच्याकडून ३-१ (११-७, १३-११, ६-११, ११-७) अशी हार स्वीकारावी लागली.

साथियनचा सूर हरपला

स्पर्धेत बुधवारी अचंता शरथ कमल याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुरुष एकेरीत साथियन ज्ञानशेखरन याच्यावर भारताच्या आशा होत्या. पण युवा जपानी खेळाडूने त्याला ३-० (११-९, ११-५, ११-८) असे नमविले.

जागतिक क्रमवारीत युकिया २२व्या, तर साथियन ४१व्या क्रमांकावर आहे. त्यापूर्वी मिश्र दुहेरीत साथियन व मनिका बत्रा जोडीवर जपानच्या शुनसुके तोगोमी व मिवा हारिमोतो जोडीने ३-० (१२-१०, ११-६, ११-६) असा विजय नोंदविला होता.

मनिका-अर्चनाचे आव्हान संपुष्टात

महिला दुहेरीत बुधवारी रोमहर्षक विजय नोंदविलेल्या मनिका बत्रा व अर्चना कामत यांना पुढील फेरी गाठता आली नाही. तैवानच्या चेंग चिंग व लि यू-झुन जोडीने त्यांना ३-१ (८-११, १५-१३, ११-९, ११-७) असे हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला केवळ दोन दिवस बाकी; यात्रेकरूंच्या राहण्याची, पार्किंगची तयारी कुठवर आली?

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT