Suryakumar Yadav | India vs Australia PTI
क्रीडा

IND vs AUS: सूर्यकुमार बनला भारताचा 13 वा T20 कर्णधार! पहिला सामना जिंकल्यानंतर म्हणाला...

Suryakumar Yadav: भारताला गेल्या 17 वर्षांत टी20 क्रिकेटमध्ये 13 कर्णधार मिळाले आहे. आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूंनी नेतृत्व केलंय जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia, 1st T20I Match at Visakhapatnam, Captain Suryakumar Yadav:

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (23 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या टी20 सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने भारतीय संघाचे नेतृत्व केले. हा त्याचा भारताचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता.

पहिल्या विजयानंतर सूर्यकुमारने दिली प्रतिक्रिया

'पहिला विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, 'खेळाडू ज्याप्रकारे खेळले, ते पाहून आणि त्यांची उर्जा पाहून आनंद झाला. आम्ही दबावाखाली होतो, पण तरीही सर्वांनी दाखवलेली कामगरी शानदार होती. हा अभिमानाचा क्षण आहे. जेव्हाही तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुम्हाला अभिमानच वाटतो, पण येथे येऊन भारताचे नेतृत्व करणे खूप मोठी गोष्ट आहे.'

कर्णधार सूर्यकुमारने जिंकला पहिला सामना

दरम्यान, सूर्यकुमारने कर्णधार म्हणून पहिला सामना खेळताना भारताच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला. गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यकुमारने 42 चेंडूत 80 धावांची सर्वोच्च खेळी केली.

तसेच ईशान किशनने 58 धावा केल्या. या दोघांमध्ये 112 धावांची भागीदारी देखील झाली. ते दोघे बाद झाल्यानंतर अखेरीस रिंकू सिंगने जबाबदारी स्विकारत 14 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी करत भारताला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना जॉस इंग्लिसच्या (110) शतकाच्या आणि स्टीव्ह स्मिथच्या (52) अर्धशतकाच्या जोकावर 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या.

सूर्यकुमारने केले खेळाडूंचे कौतुक

सूर्यकुमारने फलंदाजीबद्दलही मत मांडले. तो म्हणाला, 'मी विचार केलेला की कदाचीत दव पडेल, पण तसे झाले नाही. हे मोठे मैदान नाही आणि मला माहित होते की फलंदाजी नंतर सोपी होईल. विचार केलेला की कदाचीत ते 230-235 धावांपर्यंत पोहचतील, पण आमच्या गोलंदाजांनी चांगला खेळ केला.'

'अशा परिस्थितीत आम्ही फ्रँचायझी क्रिकेट खेळताना अनेकदा आलो आहे, त्यामुळे मी फक्त ईशानला सांगितले की तुझ्या खेळाची मजा घे. आम्हाला माहित होते ती काय होणार आहे. मी नेतृत्वाचं ओझं ड्रेसिंग रुममध्येच ठेवले होते. मी माझ्या फलंदाजीची मजा घेण्याचा प्रयत्न केला.'

'ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगले आहे. प्रेक्षकांचे आभार. रिंकूला पाहून मजा आली. त्याच्यासाठी करो वा मरोची परिस्थिती होती. पण तो शांत आणि संयमी होता. त्यामुळे मीही शांत होतो. 16 व्या षटकानंतर त्यांना कमी धावांत रोखण्याच गोलंदाजांचे यश होते.'

ऑस्ट्रेलियाने 15 षटकात 1 बाद 150 धावांचा टप्पा पार केला होता.

भारताचा 13 वा टी20 कर्णधार

सूर्यकुमार हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा एकूण 13 वा कर्णधार ठरला. भारताने 2006 साली पहिला टी20 सामना खेळला होता. तेव्हापासून भारताचे आत्तापर्यंत 13 खेळाडूंनी नेतृत्व केले आहे.

भारताचे सर्वात पहिल्यांदा टी20 क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने नेतृत्व केले होते. त्याच्यानंतर एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताचे टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले आहे.

यामध्ये एमएस धोनीने सर्वाधिक 72 टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना 41 विजय मिळवले, तर 28 पराभव स्विकारले. तसेच 1 सामना बरोबरीत सुटला आणि 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.

त्यापाठोपाठ रोहित शर्माने 51 आणि विराट कोहलीने 50 टी20 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. त्याचबरोबर हार्दिक पंड्याने 16 टी20 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. या चौघांनीच आत्तापर्यंत भारताचे 10 पेक्षा जास्त टी20 सामन्यांत नेतृत्व केले आहे. इतर सर्वांनी 5 किंवा त्यापेक्षाही कमी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Professional League: चुरशीच्या लढतीत FC Goaचा पराभव! कुठ्ठाळी व्हिलेजर्सने दिली 3-2 अशी मात

Ranji Trophy: गोव्याला दुसऱ्याच दिवशी दणदणीत विजयाची संधी! 'तेंडुलकर'च्या पाच विकेटनंतर 'कश्यप', 'स्नेहल' यांची शतके

SCROLL FOR NEXT