Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: 'वनडेतील रेकॉर्ड खराबच, पण...' सूर्यकुमारकडून रोहित-द्रविडने दिलेल्या सल्ल्याचा खुलासा

WI vs IND, 3rd T20I: सूर्यकुमारने वनडे क्रिकेटमधील कामगिरी चांगली नसल्याचे मान्य केले असून रोहित-द्रविडने दिलेल्या सल्ल्याचाही खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav admitted his ODI numbers are very bad: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना गयानाला मंगळवारी पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. भारताच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवने 44 चेंडूत 83 धावांची खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, सुर्यकुमार भारताचा टी20 क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. तो आयसीसी टी20 क्रमवारीतही फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याला 2022 मधील आयसीसीचा सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला होता.

मात्र असे असले तरी त्याची वनडे क्रिकेटमधील कामगिरी फारशी समाधानकारक नाही. त्याला आत्तापर्यंत या प्रकारात त्याचा प्रभाव पाडता आलेला नाही. ही गोष्ट त्याने स्वत: देखील मान्य केली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, 'मी स्वत:शी प्रामाणिक आहे, मला माहित आहे माझी वनडे आकडेवारी खूप वाईट आहे. मला हे स्विकारण्यात अजिबातच लाज वाटत नाही, कारण ते सुधारायचे कसे, हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी मला सांगितले की मी या प्रकारात जास्त खेळलो नसल्याने मला अधिक सरावाची गरज आहे.'

तसेच सूर्यकुमारने असेही सांगितले की 'त्यांवनी मला सांगितले की खेळपट्टीवर थोडा वेळ घे आणि मी संघासाठी अखेरच्या 10-15 षटकांमध्ये किती उपयोगी ठरू शकतो, याचा विचार कर. त्यांची इच्छा आहे की मी 45-50 चेंडू सामन्यातील खेळायला हवेत, मी 15-18 षटके फलंदाजी करावी आणि त्यांनी मला माझ्या क्षमतेप्रमाणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.'

सूर्यकुमारने वनडे क्रिकेटमध्ये 26 सामने खेळले आहेत. यात त्याने 24.33 च्या सरासरीने २ अर्धशतकांसह 511 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात सूर्यकुमार सलग शुन्यावर बाद झाला होता.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 51 सामन्यांमध्ये 45.64 च्या सरासरीने 1780 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचा आणि 14 अर्धशतके केली आहेत.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ब्रेंडन किंगने 42 धावांची खेळी केली, तर कर्णधार रोव्हमन पॉवेलने 40 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान सूर्यकुमार व्यतिरिक्त तिलक वर्माने नाबाद 49 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 17.5 षटकातच 3 विकेट्स गमावत हे आव्हान पार केले. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT