Suryakumar Yadav Video: सूर्यकुमारला कसे मिळाले SKY टोपन नाव? गंभीरचेही आहे खास कनेक्शन

सूर्यकुमार यादवने त्याला SKY हे टोपन नाव कसे मिळाले याबद्दल खुलासा केला आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav reveals Story behind his SKY nickname: विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव भारतीय संघातील नियमित खेळाडूंपैकी एक आहे. सध्या तो भारतीय कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला 7 जून पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.

या अंतिम सामन्यासाठी सूर्यकुमारचा भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. दरम्यान, याच सामन्यासाठी सध्या भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. या तयारीदरम्यानचा सूर्यकुमारचा एक मजेशीर व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Suryakumar Yadav
Mohit Sharma on Suryakumar: 'सूर्याने सलग 6 सिक्स मारले तरी...' 5 विकेट्स घेणाऱ्या मोहितकडून बॉलिंग प्लॅनचा खुलासा

या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार रॅपिड फायर खेळत आहे. बीसीसीआयची डिजिटल आणि सोशल मीडिया मॅनेजर रजल अरोराने त्याला प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे सूर्यकुमारने दिली आहेत. सूर्यकुमारला त्याच्या स्काय (SKY) या टोपन नावाबद्दलही विचारण्यात आले. त्यावेळी त्याने या नावामागील कारण स्पष्ट केले आहे.

त्याने सांगितले की मला वाटते की 2014-2015 दरम्यानची ही गोष्ट असेल. तेव्हा मी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होतो. गौती भाईने (गौतम गंभीर) मला हे नाव दिले होते. कारण त्याला वाटले की सूर्यकुमार यादव हे खूप मोठे होते. त्यामुळे त्याने माझे नाव स्काय ठेवले.'

स्काय हे टोपन नाव सूर्यकुमारच्या नावाच्या इंग्लिश स्पेलिंगमधील सुरुवातीच्या अक्षरांनी मिळून बनले आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar on Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची खासियत काय, कसे बनतात सुपरस्टार? सूर्यकुमार म्हणतोय...

याशिवाय सूर्यकुमारने अन्य काही प्रश्नांचीही उत्तरे दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. तो सांगतो की त्याला इंग्लंडमधील लॉर्ड्स ग्राऊंड आवडते. तसेच लंडन हे शहरही आवडते. याशिवाय त्याने त्याच्या सुपला शॉटबद्दलही खुलासा केला. त्याने सांगितले की बऱ्याचदा हा शॉट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळला जातो आणि त्याला हा शॉट खेळायला आवडतो. यावेळी सूर्यकुमारने हा शॉट कसा असतो, हे देखील दाखवले.

सूर्यकुमार नुकताच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला असून तो चांगल्या फॉर्ममध्येही होता. त्याने या हंगामात 16 सामन्यांमध्ये 43.21 च्या सरासरीने आणि 181.14 च्या स्ट्राईक रेटने 605 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 1 शतकाचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com