Suresh Raina Dainik Gomantak
क्रीडा

सुरेश रैनाने मालदीवमध्ये साजरा केला मुलगा रिओचा वाढदिवस

सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांकाने बुधवारी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Suresh Raina : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामात कॉमेंट्री क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाने बुधवारी आपल्या मुलाचा रिओचा वाढदिवस साजरा केला. 'मिस्टर आयपीएल' म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना यावेळी कोणत्याही संघाचा भाग नसल्यामुळे तो आयपीएलमध्ये (IPL) हिंदी कॉमेंट्री करताना दिसणार आहे. (Suresh Raina celebrates son Rio's birthday in Maldives)

सुरेश रैना (Suresh Raina) सध्या मालदीवमध्ये असून तो आपल्या मुलाचा रिओचा वाढदिवस साजरा करत आहे. सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांकाने बुधवारी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर करत सुरेश रैनाने लिहिले की, 'हॅपी बर्थडे रिओ. तू दोन वर्षांचा आहेस यावर अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.' सुरेश रैना व्यतिरिक्त, त्याची पत्नी प्रियांका चौधरी रैनाने देखील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांची मुलगी ग्रेशिया देखील एकत्र आहे.

या आयपीएल मेगा लिलावात सुरेश रैनाला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जपासून वेगळे झाल्यानंतर सुरेश रैनाने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्रतसे झाले नाही. सुरेश रैना हा आयपीएलचा दिग्गज खेळाडू मानला जातो, म्हणूनच त्याला मिस्टर आयपीएल म्हटले जाते. सुरेश रैनाच्या 205 आयपीएल सामन्यात 5528 धावा आहेत. रैनानेही एक शतक, 39 अर्धशतके झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT