Faf du Plessis and Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

SRH vs RCB: फक्त कॅचच नाही, तर 'तो' नो बॉलही हैदाबादसाठी ठरला व्हिलन! डू प्लेसिस अन् विराटने हिरावला विजय

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पराभव स्विकाराव्या लागलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याकडून झालेल्या दोन चूका महागात पडल्या.

Pranali Kodre

SRH missed Two chances to get wicket of Faf du Plessis: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यातच बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला दोन वेळा जीवदान मिळाले.

हैदराबादने बेंगलोरसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा बेंगलोरने 19.2 षटकात 2 विकेट्स गमावत हे आव्हान सहज पूर्ण केले. बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 172 धावांची सलामी भागीदारी केली होती.

विराटने 100 धावांची खेळी केली. तर डू प्लेसिसने 71 धावांची खेळी केली. पण डू प्लेसिसची विकेट घेण्याची हैदराबादला 2 वेळा संधी मिळाली होती. कदाचीत ही विकेट मिळाली असती, तर सामन्याला आणखी वेगळे वळण मिळू शकले असते.

झाले असे की चौथ्या षटकात डू प्लेसिस 4 धावांवर होता. त्यावेळी कार्तिक त्यागीच्या चेंडूवर त्याने मोठा फटका खेळला, पण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात ग्लेन फिलिप्सकडून त्याचा झेल सुटला आणि त्या चेंडूवर डू प्लेसिसला चौकार मिळाला.

त्यानंतरही नितीश रेड्डीने गोलंदाजी केलले्या 9 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डू प्लेसिसने मोठा फटका खेळलेला. त्यावर मयंक डागरने शानदार झेल घेतलेला. पण तो षटकातील दुसरा बाऊंसर असल्याने चेंडूच्या उंचीमुळे तिसऱ्या पंचांनी या चेंडूला नो-बॉल करार दिला. त्यामुळे डू प्लेसिसला 41 धावांवर जीवदान मिळाले.

डू प्लेसिसनेही या जीवदानांचा चांगलाच फायदा घेतला. त्याने विराटबरोबर विक्रमी भागीदारी रचताना बेंगलोरच्या विजयाचा पाया रचला. डू प्लेसिस सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.

त्याने आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 8 अर्धशतके केली आहेत. सध्या तो सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे. तो या हंगामात 700 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू आहे.

क्लासेननही केले शतक

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने शतकी खेळी केली. त्याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय केवळ हॅरी ब्रुकला 20 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने नाबाद 27 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादने 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या.

बेंगलोरकडून मायकल ब्रेसवेलने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

SCROLL FOR NEXT