Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad  Dainik Gomantak
क्रीडा

IPL: सनरायझर्स हैदराबादने 10.75 कोटींना विकत घेतलेला खेळाडू शून्यावर बाद

दैनिक गोमन्तक

IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादची (SRH) सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात संघ केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सकडून (RR) 61 धावांनी पराभूत झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजी पूर्णपणे विखुरली होती. त्याचबरोबर आघाडीच्या फळीतील फलंदाजही धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत होते.

कॅरेबियन दिग्गज निकोलस पूरन आपले खातेही उघडू शकला नाही. पूरनला ट्रेंट बोल्टने शानदार चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केले. पूरनने एकूण नऊ चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. SRH ने निकोलस पूरनला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. पूरनची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super King) आणि कोलकाता नाइट रायडर्सनेही त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावली होती.

गेल्या मोसमात 85 धावा केल्या
IPL 2021 मध्ये, पूरनने पंजाब किंग्ज (PBKS) साठी 12 सामन्यांमध्ये 7.72 च्या सरासरीने फक्त 85 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, 2020 च्या हंगामात, पूरनने 14 सामन्यांमध्ये 35.30 च्या सरासरीने 353 धावा केल्या होत्या. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. निकोलस पूरनला आयपीएल (IPL) 2019 च्या लिलावात पंजाब किंग्जने 4.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. IPL 2019 मध्ये, पूरनने 7 सामन्यात 28 च्या सरासरीने 168 धावा केल्या होत्या.

SRH ला 150 धावा देखील करता आल्या नाहीत
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 6 बाद 210 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 44 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने 41, बटलरने 35 आणि हेटमायरने नाबाद 33 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघाला सात गड्यांच्या मोबदल्यात केवळ 149 धावा करता आल्या. मार्करामने नाबाद 57 धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, सुंदरने 40 आणि रोमारियो शेफर्डने 24 धावांचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) युझवेंद्र चहलने तीन, तर ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी दोन बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT