Sunil Gavaskar Dainik Gomantak
क्रीडा

Sunil Gavaskar: गावसकरांच्या कुटुंबावर पसरली शोककळा; लाईव्ह सामन्यातील समालोचन सोडून अचानक कानपूरला रवाना

Pranali Kodre

Sunil Gavaskar leaves commentary duty during India vs England Test after mother-in-law passed away:

भारत आणि इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला चालू आहे. शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) चालू झालेल्या या सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर समालोचन करत होते. मात्र, त्यांना अचानक कानपूरला परतावे लागले.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार गावसकरांच्या सासूचे, पुष्पा मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. त्याचमुळे ते त्यांची पत्नी मार्शनील गावसकर आणि इतर कुटुंबियांसाठी समालोचन सोडून कानपूरला गेले आहेत.

दरम्यान ते काही दिवसांनी पुन्हा समालोचन करण्यासाठी परतू शकतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गावसकरांच्या आईचे, मीना गावसकरांचे 2022 मध्ये वृद्धपकाळाने निधन झाले होते. त्यावेळी देखील गावसकर ढाकामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश कसोटीत समालोचन करत होते.

गावसकरांनी क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेट प्रशासक आणि समालोचन क्षेत्रात पाऊल टाकले. ते काही काळ बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्षही होते. तसेच गेले अनेक वर्षांपासून ते समालोचन करत आहेत.

गावसकरांनी त्यांच्या कारकिर्दीत 125 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 51.12 च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. यामध्ये 34 शतकांचा आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. ते कसोटीत 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज आहेत.

तसेच त्यांनी 108 वनडे सामने खेळले असून 35.13 च्या सरासरीमे 1 शतक आणि 27 अर्धशतकांसह 3092 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT