Sunil Gavaskar | Rahul Dravid | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Sunil Gavaskar: 'रोहितकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी उत्तरे द्यायला हवी', गावसकर कॅप्टन-कोचवर कडाडले

Sunil Gavaskar: सुनील गावसकरांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफवर कडाडून टिका केली आहे.

Pranali Kodre

Sunil Gavaskar lashed out at Rohit Sharma and Rahul Dravid : रोहित शर्माने गेल्यावर्षी तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व स्विकारले होते. पण त्यानंतर भारताला आशिया चषक, टी20 वर्ल्डकप, कसोटी चॅम्पियनशी अशा मोठ्या स्पर्धांमधील महत्त्वाचे सामने जिंकण्यात अपयश आले. याबद्दल आता सुनील गावसकरांनी रोहितवर तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफवर कडाडून टिका केली आहे.

गावसकरांनी म्हटले आहे की रोहितने कर्णधार म्हणून निराश केले असून निराशाजनक कामगिरीबद्दल कर्णधार आणि प्रशिक्षकांकडून स्पष्टीकरण मागायला हवे.

गावसकरांनी इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात बोलाताना सांगितले, 'मला त्याच्याकडून खूप अपेक्षा होती. भारतात गोष्टी वेगळ्या आहेत, पण परदेशात चांगली कामगिरी करणे खरी कसोटी असते. इथेच त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.'

'आयपीएलमधील मोठा अनुभव, कर्णधार म्हणून शेकडो सामने आणि आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूंच्या मिश्रणानंतरही टी20मध्येही अंतिम सामन्यात न पोहचणे निराशाजनक आहे.'

याशिवाय गावसकरांनी असेही विचारले की निवड समीती आणि बीसीसीआयने भारताच्या परावाची समीक्षा केली का? त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जूनमध्ये झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील घेतलेल्या निर्णयाबद्दल द्रविड आणि रोहितकडून उत्तरे मागितली पाहिजे होती.

त्यांना विचारायला हवे होते की प्रथम गोलंदाजी का निवडली, ट्रेविड हेडविरुद्ध उशीरा बाउंसरचा मारा का करण्यात आला.

74 वर्षीय गावसकर यांनी कसोटी चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर संघाच्या तयारीबद्दल केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. गावसकर म्हणाले, 'आपण कोणत्या तयारीबद्दल बोलत आहोत. आता ते वेस्ट इंडिजला गेले आहेत. तुमच्यासमोर कसोटी चॅम्पियनशीपचे उदाहरण आहे.'

'तुम्ही कोणता सामना खेळत आहात का? तर मग 20-25 दिवसाबद्दल बोलत आहेत. जर तुम्ही तयारीबद्दल बोलत आहात, तर त्याबद्दल वास्तविक विचार करा. 15 दिवस आधी जाऊन दोन सराव सामने खेळा.'

'मुख्य खेळाडू आराम करू शकतात, पण नवीन खेळाडू त्यांना आव्हान देऊ शकतात, जे चांगली कामगिरी करत नाहीयेत. त्यांना हे दाखवण्याची संधीच मिळत नाही की ते किती चांगले आहेत.'

भारताचे माजी क्रिकेटपटू गावसकरांनी वरिष्ठ खेळाडूंवरही टिका केली आहे. ते म्हणाले, 'सत्य हे आहे की प्रमुख खेळाडूंना लवकर यायची इच्छा नसते. कारण त्यांना माहित आहे की काहीही झाले, तरी त्यांची निवड होणार आहे.'

'जेव्हा तुम्ही लवकर जाता, तेव्हा ते वर्कलोडबद्दल बोलतील. तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात फिट संघ समजता किंवा आधीच्या पिढीपेक्षा अधिक फिट आहे अशे सांगता, तर मग इतक्या लवकर ब्रेकडाऊन कसा होतो? जेव्हा तुम्ही 20 षटकांचा सामना खेळता, तेव्हा तुम्हाला वर्कलोडची समस्या कशी होते?'

याशिवाय सपोर्ट स्टाफवरही टिका करताना गावसकर म्हणाले, 'जर फलंदाज सातत्याने तीच चूक करत असेल, तर तुम्हाला हे विचारण्याची गरज आहे की त्याच्या फलंदाजीत काय अडचणी आहेत. तुम्ही फलंदाजाला आणखी चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुम्ही त्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला का की त्याने थोडा वेगळा गार्ड घ्यायला हवा.'

दरम्यान, सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारताला कसोटी, टी२० आणि वनडे अशा तीन मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT