Chris and Stuart Broad Dainik Gomantak
क्रीडा

Stuart Broad Retirement: निवृत्तीचा सामना, शेवटचा बॉल अन् सिक्स! ब्रॉडने बापाच्या डोळ्यांचे फेडले पारणे

Stuart Broad Six: स्टुअर्ट ब्रॉडने फलंदाजीतील कारकिर्द षटकारासह संपवली, त्यावेळी त्याचे वडील ख्रिस ब्रॉडही उपस्थित होते.

Pranali Kodre

Stuart Broad Last Ball Six: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस २०२३ मालिका सुरू असून पाचवा सामना द ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. हा सामना सुरू असतानाच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शनिवारी (29 जुलै) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीची घोषणा केली.

दरम्यान, त्याने जेव्हा निवृत्तीची घोषणा केली होती, त्यावेळी तिसऱ्या दिवसाखेर तो इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनबरोबर नाबाद होता. त्यामुळे जेव्हा तो चौथ्या दिवशी अँडरसनसह फलंदाजीला उतरला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.

यावेळी तो मैदानात येत असताना त्याच्या आगमनावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू दोन्ही बाजूंनी उभे होते आणि त्यांनी टाळ्यांच्या गजरात ब्रॉडचे मैदानात स्वागत केले.

दरम्यान, ब्रॉड मैदानात आल्यानंतर त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या ८१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मिचेल स्टार्कविरुद्ध खणखणीत षटकार ठोकला. दरम्यान, हा त्याचा फलंदाजी करताना अखेरचा चेंडू ठरला. कारण ८२ व्या षटकात अँडरसन बाद झाला. त्यामुळे ब्रॉडची फलंदाजीतील कारकिर्द षटकारासह संपली.

विशेष गोष्ट अशी की रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडचे कुटुंबिय देखील द ओव्हलवर उपस्थित होते. त्यामुळे जेव्हा ब्रॉडने हा षटकार ठोकला, तेव्हा मैदानात तर जल्लोष झालाच, पण त्याचे कुटुंबिय देखील आनंदात दिसत होते. त्याचे वडील ख्रिस ब्रॉड यांच्या चेहऱ्यावरील आनंदही स्पष्ट दिसत होता.

ख्रिस ब्रॉड हे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आहेत, याबरोबर सध्या ते आयसीसीचे सामनाधिकारी म्हणूनही अनेकदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम पाहातात. ब्रॉडच्या अखेरच्या षटकाराचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, अद्याप या सामन्याचा अखेरचा दिवस बाकी आहे. या दिवशी ब्रॉड गोलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 249 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला 10 विकेट्सची गरज आहे.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 283 धावा केल्या, तसेच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 295 धावा करत १२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 395 धावा केल्या.

त्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 384 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाखेर बिनबाद 135 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT