Team India Best Fielder Medal BCCI
क्रीडा

Best Fielder Medal: ड्रेसिंग रुममध्ये मेडल देण्याची कल्पना कोणाची? रोहितचा खुलासा

Team India: भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिले जाणारे बेस्ट फिल्डर मेडलची कल्पना कोणाला सुचली, याबद्दल रोहितने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Story and Idea behind Best Fielding Medal in India Dressing Room During ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात हा अंतिम सामना होणार आहे.

दरम्यान, या अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघाची शानदार कामगिरी झाली आहे. भारताने 10 पैकी 10 सामने जिंकत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली आहे. दरम्यान, या वर्ल्डकपवेळी एक गोष्ट प्रचंड चर्चेत राहिली, ती म्हणजे भारताच्या प्रत्येक सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये दिले जाणारे मेडल.

भारतीय संघाकडून सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे मेडल देण्याची परंपरा या वर्ल्डकपमध्ये सुरू करण्यात आली. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची निवड क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून केली जाते. तसेच प्रत्येक सामन्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने विजेत्या क्षेत्ररक्षकाची घोषणा केली जाते.

दरम्यान, हे क्षेत्ररक्षकाला दिले जाणाऱ्या मेडलची कल्पना कोणाची होती आणि ते का दिले जाते, याबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे. त्याने आयसीसीला याबाबत सांगितले आहे.

रोहित म्हणाला, 'खरं सांगायचं तर आम्ही विचार केला नव्हता, ते अशा प्रकारे होईल. क्षेत्ररक्षक प्रशिक्षक बऱ्याचदा दुर्लक्षित राहातो. त्यामुळे त्यांनी (टी दिलीप) विचार केला की क्षेत्ररक्षकांचेही कौतुक व्हायला हवे. त्यामुळे ही त्यांची कल्पना होती की जो मैदानात चांगले क्षेत्ररक्षण करेल, त्याला मेडल दिले जाईल.'

'ज्याप्रकारे मेडल दिले गेले, ते आमच्या सर्व खेळाडूंसाठीही अनपेक्षीत होते. ते खूप नाविन्यपूर्ण होते. त्यामुळे सर्व खेळाडू एकत्र येऊन मजा करत होते. आनंदी होते. आता आपण संपूर्ण देशातही त्याचा परिणाम पाहातोय. अनेक लोक यासाठी उत्सुक असतात.'

रोहित म्हणाला, 'त्यामुळे आता क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आणि आमच्या मीडिया मॅनेजरवर दबाव असतो की हे कसे करायचे असते. आम्हाला ते मेडल कशा प्रकारे दिले जाणार हे माहित नसते, त्यामुळे संघात उत्सुकता असते.'

आत्तापर्यंत वर्ल्डकपमधील भारताच्या 10 सामन्यांमध्ये मिळून केएल राहुल, श्रेयस अय्यर रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 2 वेळा हे मेडल मिळाले आहे. तसेच विराट कोहली, शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या चौघांना प्रत्येकी एकदा मेडल मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT