Kylian Mbappe | Argentina | France | Kylian Mbappe Life Journey | FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

Kylian Mbappe Birthday Special: वर्ल्डकप फायनलमध्ये अर्जेंटिनाला टेंशन देणाऱ्या एमबाप्पेची कशी आहे लाईफ जर्नी?

फ्रान्सचा फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे आज 24 वा वाढदिवस साजरा करतोय.

Pranali Kodre

FIFA World Cup: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभूत केले आणि विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले. अर्जेंटिनाने विश्वविजेतेपद मिळवले असले, तरी या सामन्यात फ्रान्सचा युवा खेळाडू कायलिन एमबाप्पेने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

त्याने अक्षरश: संपूर्ण फ्रान्स संघाच्या विजयाच्या आशा उंचावून धरल्या होत्या. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये 2 गोल नोंदवल्यानंतर आणि दुसऱ्या हाफमध्येही केवळ 10 मिनिटे राहिलेले असताना त्याने हार न मानता 97 सेकंदाच्या अंतरात दोन गोल करत संपूर्ण सामन्याचे चित्र पालटले होते.

इतकंच नाही, तर त्याने अंतिम सामन्यात त्याला जे शक्य होईल, ते सर्व केले. त्याने गोलची हॅट्रिक केली, त्याने पेनल्टी शुटआऊटमध्येही अचूक गोल केला. मात्र, यंदा विजयाची माळ त्याच्या गळ्यात पडली नाही. मात्र, त्याने या वर्ल्डकपमध्ये 8 गोलसह गोल गोल्डन बूट जिंकला.

विशेष गोष्ट अशी की कायलिन एमबाप्पेने चार वर्षांपूर्वी फ्रान्सकडून पहिल्यांदा विश्वविजेतेपद जिंकले होते. आता त्याला पुन्हा विश्वविजयाची संधी होती. त्याने या दोनच वर्ल्डकपमध्ये खेळतानाही 12 गोल केले असून त्याने पेले यांच्या वर्ल्डकपमधील 12 गोलच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. आज तो फ्रान्स संघातील महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.

पण, अनेकांना त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल फार कमी माहिती आहे. त्याचा जन्म 20 डिसेंबर 1998 रोजी झाला. त्याचे वडील विलफ्रिड हे मुळ कॅमेरुनिन वंशांचे, तर आई फायझा लामरी अल्जेरियन वंशाची आहे. ते ईशान्य फ्रान्समध्ये पॅरिसचे उपनगर बॉन्डी येथे राहत होते. येथेच कायलिनही लहानाचा मोठा झाला.

बॉन्डी हे असे गाव होते, जे हिंसाचार आणि दंगलीसाठी ओळखले जात होते. अशा वातावरणातही विलफ्रिड यांनी आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी घेतली. विलफ्रिड स्वत: फुटबॉल प्रशिक्षक होते, तर फायझा माजी हँडबॉल खेळाडू होत्या. त्यामुळे खेळाचे बाळकडून कायलिनला घरातूनच मिळाले होते.

तो 5-6 वर्षांचा असतानाच विलफ्रिड यांनी त्याला एएस बॉन्डीमध्ये दाखल केले. तिथे ते स्वत: प्रशिक्षण देत होते. तेव्हापासून कायलिनने फुटबॉलवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. त्याने तिथे फुटबॉलचे अनेक बारकावे शिकले. तो लहान असतानाच चांगला तयार झाला होता. त्याला नंतर अँटानिओ रिकार्डी यांनीही प्रशिक्षण दिले.

दरम्यान, तो लहान असताना संगीत विद्यालयातही शिकला. तिथे तो बासरी वाजवण्यासही शिकला. पण त्याला पुढे फार शाळा शिकण्यास रस नव्हता. त्याला बऱ्यापैकी त्याच्या वडीलांनी घरीच शिकवले.

तो पुढे एएस मोनॅको संघाकडून खेळला. तिथे त्याचे कौशल्य पाहून पॅरिस सेंट जर्मन क्लब प्रभावित झाला आणि त्याच्याशी त्यांनी करार केला. त्यामुळे आता कायलिन पीएसजी संघाकडून खेळताना दिसतो.

दरम्यान, तो लहान असताना त्याच्या पालकांनी सामान्य मुलांपेक्षा थोडे वेगळ्या प्रकारे त्याला वाढवले होते. त्याला लहान असतानाच त्यांनी त्याला काही फुटबॉल स्टार्सला भेटवले होते. तो केवळ पाच वर्षांचा असताना फ्रान्सचे दिग्गज थेरी हेन्री यांच्याशी त्याची भेट झाली होती.

तसेच तो 14 वर्षांचा असताना एकदा फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू झिनादिन झिदानलाही भेटला होता. त्यावेळीचा किस्सा असा की एकदा झिदान त्याला पार्किंगमध्ये भेटला. त्यावेळी झिदानने त्याला लिफ्ट दिली होती.

त्याने त्याला पुढच्या सीटवर बसण्यासही सांगितले. पण, तेव्हा थोडा नर्वस झालेल्या कायलिनने त्याला विचारले की शूज काढून बसू का, त्यावर झिदानने नको, तसाच बस असं सांगत त्याला त्याच्या आलिशान कारमध्ये बसायला लावले. झिदानने त्याला ट्रेनिंगच्या ठिकाणी पोहोचवले होते. त्यावेळी झिदान फ्रान्समधील एक मोठा खेळाडू होता आणि कायलिन त्याचा मोठा चाहता होता. अशा परिस्थितीत कायलिनसाठी ही अविस्मरणीय आठवण ठरली.

कायलिन हा पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही मोठा चाहता आहे. त्याने त्याच्या खोलीत रोनाल्डोचे अनेक पोस्टरही चिटकवले होते. आणि आज तो रोनाल्डोच्या विरुद्धही खेळला आहे. आज वयाच्या 24 व्या वर्षीच कायलिन एमबाप्पे फ्रान्सचा मोठा खेळाडू ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT