Steve Waugh X/ICC
क्रीडा

Steve Waugh: '...तर कसोटीचा मृत्यू', द. आफ्रिकेच्या 'त्या' निर्णयामुळे स्टीव्ह वॉ ICC सह सर्व क्रिकेट बोर्डांवर बरसले

Test Cricket: कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी आयसीसीसह भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या क्रिकेट बोर्डांनी पुढाकार घेण्याबद्दल स्टीव्ह वॉ यांनी सुचवले आहे.

Pranali Kodre

Steve Waugh slammed ICC and top cricket boards with South Africa for not protecting Test cricket:

कसोटी क्रिकेट प्रकाराला महत्त्व न देण्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह सर्वच क्रिकेट बोर्डांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेट वाचवण्याच्या दृष्टीने उपायही सुचावला आहे.

खरंतर काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाने न्युझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. या संघात 7 अशा खेळाडूंना निवडले आहे, ज्यांनी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पदार्पणच केले नाही, विशेष म्हणजे ज्या खेळाडूला कर्णधार म्हणून निवडले आहे, त्याचेच अद्याप पदार्पण झालेले नाही.

दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या टी20 लीगला प्राथमिकता देत असा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे स्टीव्ह वॉ यांनी टीका केली आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना वॉ यांनी म्हटले की 'नक्कीच त्यांना कसोटी क्रिकेटची काळजी नाही. जर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आपल्या सर्वोत्तम खेळाडूंना मायदेशी ठेवून भविष्याबाबत काही संकेत देत असेल, तर असे होणार आहे. जर मी न्यूझीलंडच्या जागेवर असतो, तर मी मालिकाच खेळली नसती. मला माहित नाही ते का खेळणार आहेत. जर तुम्ही न्यूझीलंड क्रिकेटचा सन्मान करणार नसाल, तर खेळण्याचा काय अर्थ आहे.'

त्यांनी पुढे म्हटले 'हा कसोटी क्रिकेटच्या मृत्यूचा क्षण आहे. नक्कीच आयसीसीसह भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या क्रिकेट बोर्डांनी पुढाकार घेऊन कसोटी क्रिकेटला वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.'

'इतिहास आणि परंपरा यांचे महत्त्व असते. आपण जर यासाठी उभे नाही राहिलो आणि केवळ नफा कमावण्याचाच विचार केला, तर ब्रॅडमन, ग्रेस, सोबर्स यांचा वारसा असंबद्ध ठरेल.'

वॉ यांनी पुढे म्हटले, 'मला कळत नाहीये खेळाडू का येत नाहीत. त्यांना योग्य मानधन दिले जात नाहीये. मला कळत नाहीये आयसीसी आणि अव्वल देश, जे खूप पैसा कमवत आहेत, ते कसोटी सामन्यासाठी नियमित फी का देत नाहीत, ज्यामुळे लोकांना कसोटी क्रिकेटसाठी प्रोत्साहन मिळेल. नाहीतर ते फक्त टी10 आणि टी20 क्रिकेटच खेळतील.'

त्यांनी असेही म्हटले की जर कसोटी क्रिकेट राहिले नाही, तर खेळाडू स्वत:ला तपासू शकणार नाहीत. ते म्हणाले, 'समस्या काय आहे, हे निश्चित आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला त्यांचा मजबूत संघ पाठवलेला नाही. त्यांनी गेल्या काहीवर्षात त्यांचा मजबूत कसोटी संघ निवडलेला नाहीय निकोसल पूरन सारखा खेळाडू, जो चांगला कसोटी फलंदाज आहे; जेसन होल्डर, जो त्यांचा कदाचीत सर्वोत्तम खेळाडू आहे. ते आत्ता कसोटी क्रिकेट खेळत नाहीत.'

'अगदी पाकिस्ताननेही त्यांचा मजबूत संघ ऑस्ट्रेलियाला पाठवलेला नाही. जर आयसीसी किंवा आणखी कोणी जलद पावले उचलली नाहीत, तर कसोटी क्रिकेट उरणार नाही. कारण तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध तुम्ही स्वत:ला तपासू शकत नाही.'

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 4 ते 17 फेब्रुवारी दरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाठी नील ब्रँडला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT