Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: स्मिथने धोनी-सचिनला पछाडलं, वनडेत गाठला 'हा' मैलाचा दगड

Pranali Kodre

India vs Australia, 3rd ODI Match at Rajkot, Steve Smith Record:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटला झालेल्या तिसऱ्या वनडे मालिकेत खेळताना स्टीव्ह स्मिथने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्मिथने अर्धशतकी खेळी केली.

स्मिथने या सामन्यात 61 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. ही खेळी करताना त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा त्याने 129 वनडे डावा खेळताना पूर्ण केला.

त्यामुळे तो वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे, तर जगातील 17 व्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, त्याने याबाबतीत भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने 138 वनडे डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.

स्मिथने सचिनबरोबरच स्मिथने ग्रॅमी स्मिथ (131), मार्टीन गप्टील (132), पॉल स्टर्लिंग (132), मॅथ्यू हेडन (133),मायकल बेवन (135), एमएस धोनी (135), गौतम गंभीर (135), गॅरी कर्स्टन (137), जॅक कॅलिस (137), रिकी पाँटिंग (137), ख्रिस गेल (137) यांनाही वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मागे टाकले आहे.

दरम्यान, वनडेत सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथच्या पुढे केवळ डेव्हिड वॉर्नर (115), ऍरॉन फिंच (126) आणि डीन जोन्स (128) हे ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत.

सध्या वनडेत सर्वात जलद 5000 धावा करण्याचा विश्वविक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 97 डावात हा टप्पा पार केला होता. तसेच त्यानंतर हाशिम आमला (101), विव रिचर्ड्स (114), विराट कोहली (114) यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ व्यतिरिक्त मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने 56 धावा केल्या, तर मार्नस लॅब्युशेन 72 धावा करून बाद झाला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT