सामन्याची मानकरी पुरस्कार स्वीकारताना युनायटेड क्लब तळावलीची स्टेसी कार्दोझ  Dainik Gomantak
क्रीडा

तळावलीच्या विजयात स्टेसीचे पाच गोल

75 व्या आणि 90+1 व्या मिनिटास गोल नोंदवत स्टेसीने तळावलीच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: कर्णधार स्टेसी कार्दोझ हिने नोंदविलेल्या पाच गोलच्या बळावर युनायटेड क्लब तळावली संघाने गोवा फुटबॉल (Football) असोसिएशनच्या महिला फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी दणदणीत विजय नोंदविला. त्यांनी यंग बॉईज ऑफ टोंक स्पोर्टस क्लबचा 7-0 फरकाने धुव्वा उडविला. सामना धर्मापूर येथील मैदानावर झाला.

तळावली संघ पूर्वार्धात तीन गोलने आघाडीवर होता. स्टेसी हिने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास पहिला गोल केला. 20 व्या मिनिटास कॅरेन एस्ट्रोसियो हिने संघाच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकली.

स्टेसी हिनेच 29 व्या मिनिटास आणखी एक गोल नोंदवत तळावलीची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर रिझेला आल्मेदा (Rizella Almeida) हिने 55 व्या मिनिटास गोल केला. नंतर 67 व्या मिनिटास स्टेसीने हॅटट्रिकचा मान मिळविला. 75 व्या आणि 90+1 व्या मिनिटास गोल नोंदवत स्टेसीने तळावलीच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

SCROLL FOR NEXT