क्रीडा

Asia cup 2022 जिंकणाऱ्या श्रीलंकेवर करोडों रूपयांची बरसात

पाकिस्तान संघालाही मिळाले मोठे बक्षिस

गोमन्तक डिजिटल टीम

राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आशिया चषक (Asia cup 2022) विजयाने देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीलंका (Srilanka) संघाने रविवारी पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला. श्रीलंकेचा विजय केवळ श्रीलंकन ​​क्रिकेटसाठीच नाही तर ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

आशिया चषकाचा अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. श्रीलंका एका टप्प्यावर 58 धावांत पाच गडी गमावल्यानंतर भानुका राजपक्षेच्या 45 चेंडूंत नाबाद 71 धावांच्या जोरावर श्रीलंकेने सहा बाद 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 147 धावांवर आटोपला. पाकिस्तानचे खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.

आशिया चषकाचे जेतेपद पटकावल्याने राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेशी झुंजणाऱ्या श्रीलंकेसाठी दिलासा मिळाला आहे. खरे तर आशिया चषक विजेतेपदासाठी श्रीलंकेच्या संघाला सुमारे 1.20 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच, पराभूत पाकिस्तान संघाला बक्षीस म्हणून सुमारे 60 लाख रुपये मिळाले आहेत.

आशिया चषकात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडला आहे. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचे किताब वानिंदू हसरंगाला मिळाला असून, त्याला सुमारे 11.94 लाख रुपये देण्यात आलेत. याशिवाय अंतिम फेरीतील खेळाडूचा किताब भानुका राजपक्षे याला मिळाला आहे, त्यांना 4 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT