Sri Lanka’s Playboy Cricketer: Dainik Gomantak
क्रीडा

Sri Lanka’s Playboy Cricketer: क्रिकेटविश्वात चर्चा श्रीलंकेच्या ‘प्ले बॉय’ क्रिकेटरची; डेटिंग अ‍ॅपमुळे आला अडचणीत

ऑस्ट्रेलियात महिलेवर लैंगिक अत्याचार; यापुर्वीही अशाच रंगेल प्रकरणांत अडकल्याने झालीय कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Sri Lanka’s Playboy Cricketer: जंटलमन्स गेम अशी क्रिकेट या खेळाची ओळख आहे. तथापि, अनेक खेळाडू त्यांच्या वर्तनाने क्रिकेटची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करत असतात. श्रीलंकेचा एक क्रिकेटपटूने त्याच्या मैदानाबाहेरील अशाच वर्तनाने चर्चेत आला आहे.

दानुष्का गुनातिलाका (Danushka Gunathilaka) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. 31 वर्षीय गुनातिलाका याला ऑस्ट्रेलियन महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक सिडनी पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीलंकन क्रिकेट संघासोबत टी-20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी (T-20 World Cup 2022) तो ऑस्ट्रेलियात आला होता. दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. तथापि, या काळात टिंडर या ऑनलाईन डेटिंग ऍपवरून एका 29 वर्षीय महिलेशी त्याची ओळख झाली. तिच्या संमतीविना जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ऑनलाईन डेटिंग ऍपवर दीर्घकाळ चॅटिंगनंतर 2 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डकडून निलंबन

या प्रकरणी श्रीलंकन क्रिकेट मंडळानेही आता कारवाई केली असून गुनातिलाका याला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही संघ निवडीत गुनातिलाका याचा विचार केला जाणार नाही. श्रीलंका क्रिकेट या प्रकरणात आवश्यक ती पावले उचलेल आणि चौकशीही करेल. कारवाई करण्यास हयगय करणार नाही, असेही बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे.

स्थानिक न्यायालयाने या प्रकरणात गुनातिलाका याला जामिन नाकारला आहे. आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे, असे गुनातिलाका याच्या वकिलांनी सांगितले.

गुनातिलाका याचे या आधीही वारंवार निलंबन

दरम्यान, गुनातिलाका याच्या बाबतीत अशा वर्तनाची आणि त्याच्यावरील कारवाईची ही पहिलीच वेळ नाही. वारंवार शिस्तभंग, नियमांचे पालन न करणे आणि प्ले बॉयला साजेसे वर्तन यामुळे त्याच्यावर सतत कारवाई होत आली आहे. त्यामुळे मैदानावरील कर्तृत्वापेक्षा मैदानाबाहेरील वर्तनानेच गुनातिलाका जास्त चर्चेत राहिला आहे.

पार्टीकल्चरसाठी ओळखला जातो गुनातिलाका

गुनातिलाका हा पार्टी कल्चरसाठी ओळखला जातो. यापुर्वी 2018 मध्ये कोलंबोमधील ज्या हॉटेलमध्ये श्रीलंकेचा संघ थांबला होता तिथेच नॉर्वेच्या एका महिलेवर गुनातिलाका याच्या संदीप सेलिया या  सहकाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. त्या रूममध्ये गुनातिलाकादेखील होता, असा आरोप महिलेने केला होता. त्यावर तो झोपला होता, आणि रूममध्ये काय झाले, हे माहिती नाही, असे गुनातिलाका म्हणाला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गुनातिकाला हा फॉर्ममध्ये असलेला आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा बॅटसमन होता.

शिस्तभंगामुळे कारवाई

त्यापुर्वी ऑक्टोबर 2017 मध्ये गुनातिलाका याने प्रशिक्षणालाच दांडी मारली. तर त्यानंतरच्या दिवशी तो किट बॅगशिवायच ट्रेनिंगला आला. तेव्हा त्याला सहा सामन्यांसाठी निलंबित केले गेले. दरम्यान, गतवर्षी कोरोनाकाळात आयोजित इंग्लंड दौऱ्यात बायो बबलचे कवच तोडल्याप्रकरणी गुनातिलाका याला १२ महिन्यांसाठी निलंबित केले होते. दुखापतींमुळे त्याला टी-२० वल्र्ड कपला मुकावे लागले होते.

अशी आहे कारकिर्द

गुंथिलाका याने श्रीलंकेसाठी ८ कसोटी, ४७ एकदिवसीय सामने आणि ४६ टी-२० लढती खेळल्या आहेत. आणि श्रीलंकेच्या टी-20 वर्ल्डकपसाठीच्या संघात स्थान नसतानाही तो संघ सहकाऱ्यांसोबत थांबला होता.

मी वाईट माणूस नाही : गुनातिलाका

गुनातिलाका म्हणतो की, माझी जीवनशैली श्रीलंकेच्या इतर क्रिकेटपटुंपेक्षा वेगळी आहे. पण याचा अर्थ मी वाईट माणूस आहे, असा होत नाही. मी बारमध्ये असेन तर मी मित्रांसोबत वेळ घालवत असतो. पण मला तिथे पाहणाऱ्या लोकांना वाटते की मी पितोय, पार्टी करतोय आणि क्रिकेटवर लक्ष देत नाही. मला खासगी आयुष्यच राहिलेले नाही. मी नेहमी क्लबिंग आणि तसेच काही नेहमी करतो, असेच काहींना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT