SL vs BAN| Nagin Dance
SL vs BAN| Nagin Dance  Dainik Gomantak
क्रीडा

SL vs BAN: श्रीलंकन टिमचा नागिन डान्स व्हिडाओ होतोयं व्हायरल

दैनिक गोमन्तक

दुबईत गुरुवारी बांग्लादेशविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी नागिन नृत्य केले आहे. चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये बांग्लादेशने श्रीलंकेला हरवून अशा प्रकारे आनंद साजरा केला होता. आशिया चषकाच्या करा किंवा मरोच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने बांग्लादेशी संघाचा याच शैलीत आनंद साजरा केला. त्याचा व्हिडिओ चांगलाच सोशले मिडीयावर व्हायरल होत आहे.

* सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध झाले

विशेष म्हणजे 2022 आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका आणि बांग्लादेश (Bangladesh) या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण विजेत्या संघाला सुपर-4 मध्ये जावे लागणार होते आणि पराभूत संघासाठी ही स्पर्धा संपणार होती. अशात सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झाले.

या महत्त्वाच्या सामन्यात बांग्लादेशने प्रथम खेळून 183 धावा केल्या. या महत्त्वाच्या सामन्यात एवढी मोठी धावसंख्या मॅच-विनिंग टोटल वाटत होती. पण श्रीलंकेचे फलंदाज वेगळेच प्लॅन घेऊन मैदानात उतरले. मध्येच विकेट पडत राहिल्या, पण दासून शनाका संघाने आक्रमक क्रिकेट (Cricket) खेळणे सुरूच ठेवले. अशाप्रकारे श्रीलंकेच्या संघाने 19.2 षटकांत आठ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. या विजयासह श्रीलंकेचा संघ सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी बांग्लादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

सामना संपल्यानंतर श्रीलंकेचा (Sri-Lanka)अष्टपैलू चमिका करुणारत्ने उत्साहाने भरला होता आणि नागिन डान्स सुरू होता. आता त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शारजाहच्या मैदानावर आता श्रीलंकेचा संघ सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानशी भिडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT