Suranga Lakmal Dainik Gomantak
क्रीडा

भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा धडाकेबाज गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा

श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरंगा लकमलची कारकीर्दही संपुष्टात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंका क्रिकेट संघ या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध (India vs Sri Lanka) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसह श्रीलंकेच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरंगा लकमलची (Suranga Lakmal) कारकीर्दही संपुष्टात येणार आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लकमलने भारत दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) अलविदा करण्याची घोषणा केली आहे. लकमलने 13 वर्षांपूर्वी 2009 मध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता त्याची कारकीर्द भारताविरुद्धच संपणार आहे. (Sri Lankan Cricketer Suranga Lakmal Will Retire From International Cricket After The India Tour)

दरम्यान, बुधवार, 2 फेब्रुवारी रोजी श्रीलंका क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, संघाच्या माजी कर्णधाराने भारत दौऱ्यानंतर तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 34 वर्षीय लकमलने या निवेदनात आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि म्हटले की, " संघातील खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफ, प्रशासक आणि इतर कर्मचारी यांच्याबद्दल मला खूप आदर आहे."

श्रीलंका बोर्डाचे आभार

श्रीलंकेचे पाच कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या मंडळाचे आभार मानले आणि आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात खूप सुधारणा झाल्याचे सांगितले. लकमल पुढे म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा घडवून आणणाऱ्या मंडळाशी संलग्न राहण्यासाठी आणि माझ्या मातृभूमीला सन्मान मिळवून देण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी श्रीलंका क्रिकेटचा आभारी आहे. मी भाग्यवान आहे."

लकमलच्या कारकिर्दीवर एक नजर

सुरंगा लकमलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये भारताविरुद्धच्या वनडे मालिकेने झाली. लकमलने डिसेंबर 2009 मध्ये नागपुरात भारताविरुद्ध पदार्पण केले. सुमारे एक वर्षानंतर, नोव्हेंबर 2010 मध्ये, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीला 2011 मध्ये सुरुवात झाली. लकमलने आतापर्यंत एकूण 68 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या खात्यात 168 विकेट्स जमा झाल्या आहेत. त्याने 4 वेळा एका डावात 5 विकेट घेतल्या. त्याचवेळी, 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये लकमलने 109 विकेट घेतल्या, तर 11 टी-20 मध्ये त्याला केवळ 8 विकेट मिळाल्या. भारताविरुद्ध, लकमलने 2 कसोटीत 8 विकेट, 11 एकदिवसीय सामन्यात 9 विकेट घेतल्या, तर एकमेव टी-20 मध्ये त्याला कोणतेही यश मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT