न्यूझीलंडच्या 'या' स्टार क्रिकेटरने आयसीसीचा ICC Spirit Of Cricket अवार्ड जिंकला

न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू डॅरिल मिशेलला आयसीसीने ICC Spirit Of Cricket पुरस्काराने सन्मानित केले आहे.
Daryl Mitchell
Daryl MitchellDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू डॅरिल मिशेलला आयसीसीने ICC Spirit Of Cricket पुरस्काराने सन्मानित केले आहे. 2021 च्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखविलेल्या खिलाडूवृत्तीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना इंग्लंडशी झाला होता. हा सामना अबुधाबीमध्ये खेळविण्यात आला होता. डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) हा पुरस्कार जिंकणारा न्यूझीलंडचा (New Zealand) चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी, ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendan McCullum) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) यांनी आयसीसीचा (ICC) हा विशेष सन्मान पटकावला आहे. (Daryl Mitchell Has Been Awarded The ICC Spirit Of Cricket Award By The ICC)

दरम्यान, 10 नोव्हेंबर 2021 रोजी अबू धाबीमध्ये खेळल्या गेलेल्या हाई प्रेशर सेमीफाइनल उपांत्य सामन्यात मिशेलने इंग्लंडविरुद्ध (England) सिंगल रन घेण्यास नकार दिला होता. त्याच्या याच खिलाडूवृत्तीची मान राखत आयसीसीने त्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट या सन्मानाने सन्मानित केले.

Daryl Mitchell
पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत 'या' ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य

पुरस्कार मिळाल्यानंतर मला अभिमान वाटतो - मिशेल

न्यूझीलंडच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने आयसीसीने सन्मानित केल्याबद्दल स्वतःला भाग्यवान मानले. 'हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद होत असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. माझ्यासाठी हा सन्मान बहुमोलाचा आहे. UAE मध्ये T20 विश्वचषक खेळणे हा एक अद्भुत अनुभव होता. आणि, हा पुरस्कार मिळाल्यानंतर आता सर्व काही छान वाटत आहे. मला न्यूझीलंडचा खेळाडू असल्याचा मला अभिमान वाटत आहे. आम्हाला उपांत्य फेरीचा सामना आमच्याच जिद्दीवर जिंकायचा होता. एवढ्या मोठ्या स्पर्धेत आम्हाला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता. त्यामुळे मला जे योग्य वाटले ते मी केले,' असल्याचे मिशेलने म्हटले आहे.

ती सेमीफायनलसारखीच होती

T20 विश्वचषक 2021 ची ती पहिली उपांत्य फेरी होती, ज्यामध्ये डॅरिल मिशेलला त्याच्या खिलाडूवृत्तीसाठी पुरस्कार मिळाला. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 4 बाद 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 167 धावांचे लक्ष्य एका ओव्हरपूर्वीच गाठले होते. ही घटना या सामन्याच्या 18 व्या षटकात घडली, ज्यासाठी डॅरिल मिशेलला पुरस्कार मिळाला. 47 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी खेळून संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मिचेलचीही सामन्याचा हिरो म्हणून निवड करण्यात आली.

मात्र, फायनलमध्ये न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाकडून (Australia) पराभव झाला. आणि किवी संघाने उपविजेता बनून स्पर्धेतील आपला प्रवास संपवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com