Sri Lanka Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, 'हा' स्टार खेळाडू संघाबाहेर!

World Cup 2023: यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच भारत या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच भारत या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. दरम्यान, हळूहळू सर्व देशांनी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपले संघ जाहीर केले.

मात्र आतापर्यंत चाहते श्रीलंकेच्या संघाच्या घोषणेची वाट पाहत होते. मात्र आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात 15 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

ट्रॅव्हलिंग रिजर्व्ह खेळाडू म्हणून एका खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, एक स्टार खेळाडू श्रीलंकेच्या संघात नसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेच्या संघातून स्टार खेळाडू बाहेर

स्टार अष्टपैलू वानिंदू हसरंगा याला श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघातून वगळण्यात आले आहे. हसरंगा अजूनही लंका प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. या 26 वर्षीय खेळाडूला दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर व्हावे लागले होते.

त्याच्या जागी दुषण हेमंताचा संघात समावेश करण्यात आला होता. श्रीलंकन ​​बोर्डाने आता काही वेळापूर्वीच आयसीसी विश्वचषक 2023 साठी आपल्या 15 खेळाडूंची घोषणा केली. दसुन शनाकाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, जो आधीच ही जबाबदारी सांभाळत होता.

या खेळाडूंना स्थान मिळाले

याशिवाय, ज्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे त्यात पाथुम निसांका, कुसल जेनिथ, दिमुथ करुणारत्ने, चरिथ असालंका, धनंजय डिसिल्वा, सदिरा समरविक्रमा, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, मथिशा पाथिराना आणि लाहिरु कुमारा यांचा समावेश आहे.

ट्रॅव्हलिंग रिजर्व्ह खेळाडू म्हणून चमिका करुणारत्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या संघाने सलग दोनदा आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली होती, पण विजेतेपद पटकावण्यास ते कमी पडले.

1996 मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने विश्वचषक जिंकला होता. 2011 च्या विश्वचषकात टीम फायनलमध्ये पोहोचली होती, पण टीम इंडियाने (Team India) हरवून दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले होते.

श्रीलंकेचा संघ:

दसुन शनाका, कुसल मेंडिस, दुशान हेमंथा, महेश तिक्षणा, दिलशान मदुशांका, पाथुम निसांका, कुसल जेनिथ, दिमुथ करुणारत्ने, चारिथ असालंका, धनंजय डिसिल्वा, सदिरा समरविक्रम, दुनिथ वेलालागे, कसुन राजिथा, मथीशा पथिराना, लाहिरु कुमारा.

राखीव खेळाडू: चमिका करुणारत्ने

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT