ODI World Cup 2023: वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये 'हिटमॅन' करणार चमत्कार, गांगुलीचा मोडणार रेकॉर्ड!

Rohit Sharma Records: यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच भारत या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma Records: यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच भारत या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. 2011 मध्ये भारताने श्रीलंकेला हरवून आयसीसी ट्रॉफी जिंकली होती पण त्यानंतर भारताला एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही.

अशा स्थितीत 12 वर्षांनंतर त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मोठी कामगिरी करु शकतो.

हिटमॅन बनणार नंबर-1!

दरम्यान, 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्याने भारताचा विश्वचषकातील प्रवास सुरु होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा काही धावा काढताच तो भारताचा पहिला फलंदाज बनेल.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 17 सामन्यांमध्ये रोहितच्या नावावर आतापर्यंत 978 धावा आहेत. जर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 22 धावा केल्या तर तो विश्वचषक स्पर्धेत 1000 धावा (18 सामने) पूर्ण करणारा भारताचा सर्वात वेगवान फलंदाज बनेल.

Rohit Sharma
ODI World Cup 2023: 'थलैवा'ला गोल्डन तिकीट; बिग बी, सचिन तेंडुलकरनंतर बीसीसीआयने केला सन्मान

या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडू शकतो

या सामन्यात रोहित टीम इंडियाच्या (Team India) महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचा एक मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे.

खरं तर, भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 1006 धावा आहेत, तर रोहित त्याच्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर आहे (978 धावा). रोहित 22 धावा करताच सौरव गांगुलीला मागे सोडले.

2019 च्या विश्वचषकात 5 शतके झळकावली होती

दुसरीकडे, 2019 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माने 1-2 नव्हे तर 5 शतके झळकावली होती. मात्र उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने भारत स्पर्धेतून बाहेर पडला.

रोहितने बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध शानदार शतकी खेळी खेळली होती. यावेळीही रोहितची बॅट अशीच तळपत राहिली तर टीम इंडिया चॅम्पियन होण्यापासून दूर नाही.

Rohit Sharma
ODI World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार, शाहबाज सरकाकडून ग्रीन सिग्नल

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर - 2278

विराट कोहली - 1030

सौरव गांगुली - 1006

रोहित शर्मा - 978

राहुल द्रविड - 860

वीरेंद्र सेहवाग - 843

मोहम्मद अझरुद्दीन - 826

एमएस धोनी - 780

युवराज सिंग - 738

कपिल देव - 669

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com