Sri Lanka vs Bangladesh Controversy ANI
क्रीडा

World Cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशशी हस्तांदोलन करण्यास नकार! मॅथ्यूजनं सांगितलं, 'कारण त्यांनी आम्हाला...'

Sri Lanka vs Bangladesh Controversy: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सोमवारी सामन्यानंतर श्रीलंकेने बांगलादेशच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

Pranali Kodre

Sri Lanka refused to shake hands with Bangladesh after match in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात सामना खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्याचे प्रकरण प्रचंड चर्चेत राहिले.

या प्रकरणामुळे श्रीलंकेच्या संघाने सामन्यानंतर बांगलादेश संघातील खेळाडूंशी हात मिळवण्यासही नकार दिला. श्रीलंकेचे म्हणणे आहे की बांगलादेशने त्यांचा आणि खिलाडूवृत्तीचा आदर केला नाही. याबद्दल अँजेलो मॅथ्यूजनेच सामन्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे.

मॅथ्यूज सामन्यानंतर म्हणाला, 'तुम्हाला जे आदर देतात, त्यांनाच तुम्ही आदर द्यायला हवा. माझ्या कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडले.

'मी खूपच चकीत झालो होतो. मी असे म्हणत नाही की मी जर फलंदाजी केली असती, तर आम्ही सामना जिंकलोच असतो. पण ज्यावेळी ती घटना घडली, ती सामन्याची खूप महत्त्वाची वेळ होती. कदाचीत आम्ही अजून काही वेगळे करू शकलो असतो. मला असे म्हणायचे आहे की कदाचीत आम्ही 54-60 धावा आणखी करू शकलो असतो.'

झाले काय?

या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीला उतल्यानंतर 25 व्या षटकात ही वादग्रस्त घटना घडली. या षटकात दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला उतरणार होता, तो मैदानात आलाही, पण पहिला चेंडू खेळण्यापूर्वीच हेल्मेटची काहीतरी समस्या झाल्याने परत गेला.

त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघाने त्याच्याविरुद्ध टाईम आऊट नियमानुसार बादसाठी पंचांकडे अपील केले. पंचांनाही नियमानुसार त्याला बाद द्यावे लागले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

दरम्यान, हे अपील मागे घेण्याबद्दल पंचांनी शाकिबला दोनवेळा विचारले होते, तसेच मॅथ्युजनेही शाकिबला झालेली घटना समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शाकिबने अपील मागे घेण्यास नकार दिला.

दरम्यान, चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक यांनी नंतर स्पष्ट केले की मॅथ्यूजच्या हेल्मेटची स्ट्रॅप तुटण्यापूर्वीच वेळ संपला होता.

बांगलादेशचा विजय

या सामन्यात श्रीलंकेने 49.3 षटकात सर्वबाद 279 धावा केल्या, त्यानंतर 280 धावांचे आव्हान बांगलादेशने 7 विकेट्स गमावत 42 षटकात पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT