Virat Kohli - Shubman Gill 
क्रीडा

World Cup 2023: गिल-कोहलीच्या झंझावातानंतर श्रेयस अय्यरचे तुफान! भारताचे श्रीलंकेसमोर 358 धावांचे आव्हान

India vs Sri Lanka: वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप 2023 मधील सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 358 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka at Wankhede Stadium:

भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (2 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 358 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारताकडून विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या तिघांनीही अर्धशतके केली. मात्र, तिघांचीही शतकाची संधी अगदी थोडक्यात हुकली. पण, त्यांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली.

भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र, रोहितची विकेट 4 धावांवर पहिल्याच षटकात दिलशान मदुशनकाने घेतली. त्याने रोहितला दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले.

मात्र, या विकेटनंतर गिलला विराट कोहलीने शानदार साथ दिली. या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली.

दरम्यान, हे दोघेही शतक करतील असे वाटत असतानाच मदुशनकानेच 30 व्या षटकात गिलला यष्टीरक्षक कुशल मेंडिसकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे गिल 92 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 92 धावा करून बाद झाला.

त्याच्यानंतर लगेचच 32 व्या षटकात मदुशनकानेच विराट कोहलीही बाद केले. विराटने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली.

त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 60 धावांची भागीदारीही केली. पण केएल राहुल 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवलाही मदुशनकाने 12 धावांवर माघारी पाठवले.

दरम्यान, श्रेयस अय्यरने आक्रमक खेळ करताना एक बाजू सांभाळली होती. त्याला दुसऱ्या बाजूने रविंद्र जडेजा साथ देत होता.

मात्र, अय्यरही आक्रमक खेळत असताना मोठ्या फटका मारण्याच्या नादात महिश तिक्षणाच्या हातात झेल देत बाद झाला. मदुशनकानेच त्यालाही बाद केले. अय्यरने 56 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 82 धावांची खेळी केली.

अखेरीस रविंद्र जडेजाने आक्रमक खेळ केला. पण तो अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने 24 चेंडूत 35 धावा केल्या. तसेच जडेजापूर्ण अखेरच्याच षटकात मोगम्मद शमीही 2 धावांवर धावबाद झाला होता.

श्रीलंकेकडून दिलशान मदुशनकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच दुश्मंता चमीराने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT