Sri Lanka Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs SL: T20 मॅचमध्ये श्रीलंकेचा न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये घरचा आहेर! 17 वर्षांनी केला 'हा' कारनामा

रविवारी श्रीलंकेने न्यूझीलंडला टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले.

Pranali Kodre

New Zealand vs Sri Lanka T20I: रविवारी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली. या मालिकेतील रोमांचक झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ऑकलंडला झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 196 धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 20 षटकात 197 धावांचे आव्हान ठेवले होते. पण न्यूझीलंडनेही 20 षटकात 8 बाद 196 धावाच केल्या. त्यामुळे निर्धारित षटकांमध्ये सामना बरोबरीत सुटला.

त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. महिश तिक्षणाने श्रीलंकेकडून या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. तसेच न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल आणि जिमी निशम यांनी फलंदाजीला सुरुवात केली.

पण पहिल्या चेंडूवर मिचेलने एक धाव काढली, पुढचा चेंडू वाईड गेला, तर दुसऱ्या चेंडूवर तिक्षणाने निशमला बाद केले. त्यामुळे मार्क चॅपमन फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. पण चॅपमनने चौथ्या चेंडूवर दोन आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर तो अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती.

श्रीलंकेकडून सुपर ओव्हरमध्ये कुशल मेंडिस आणि चरिथ असलंका फलंदाजीला उतरले, तर न्यूझीलंडकडून ऍडम मिल्नेने गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर मेंडिसने एक धाव काढली. तर दुसऱ्या चेंडूवर असलंकाने षटकार ठोकला. त्यानंतरचा चेंडू नो बॉल ठरला, पण त्यावर चौकार गेला. त्यामुळे श्रीलंकाने हा सामना जिंकला.

अशी झाले अखेरचे रोमांचक षटक

दरम्यान, 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 व्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 13 धावांची गरज होती. त्यावेळी मिल्ने आणि रचिन रविंद्र फलंदाजी करत होते. श्रीलंकेकडून हे षटक कर्णधार दसून शनका टाकत होता. त्याने पहिल्याच चेंडूवर रचिनला 26 धावांवर बाद केले.

नंतर फलंदाजीला आलेल्या इश सोधीने पुढच्या दोन चेंडूवर दुहेरी धावा काढत एकूण चार धावा केल्या. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सोधी आणि मिल्नेला एक-एक धावच करता आली. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला 7 धावांची गरज होती. त्यावेळी सोधीने षटकार ठोकला आणि सामना बरोबरीत सुटला.

सामन्याचा थोडक्यात आढावा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून असलंकाने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली, तर कुशल परेरानेही अर्धशतकी खेळी करताना 53 धावांची खेळी केली. तसेच कुशल मेंडिस (25) आणि वनिंदू हरसंगा (21) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. न्यूझीलंडकडून निशमने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने 66 धावांची खेळी केली. तसेच मार्क चॅपमन (33), रचिन रविंद्र (26) आणि टॉम लॅथम (27) यांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशन, वनिंदू हसरंगा आणि दसून शनका यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

17 वर्षांनी श्रीलंकेचा न्यूझीलंडवर विजय

दरम्यान, तब्बल 17 वर्षांनंतर न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये टी20 सामना जिंकण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी 2006 मध्ये श्रीलंकेने न्यूझीलंडमध्ये टी20 सामना जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Ranji Trophy 2025: तेंडुलकर-वासुकीला विकेट, तरी सौराष्ट्राच्या फलंदाजांचे गोव्यावर वर्चस्व; पहिल्या दिवशी भक्कम धावसंख्या

..तर पर्यटक पुन्हा गोव्यात येणार नाहीत! टॅक्सीभाडयावरील प्रश्नावरून मंत्री गुदिन्हो यांचा इशारा; ओला-उबेरला थारा देणार नसल्याची स्पष्टोक्ती

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकर सुदिनना अडकवणार?

Goa Politics: सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे वक्तव्य केले, त्यामुळे आपले मन दुखावले; ॲड. अमित सावंतांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT