Dasun Shanaka Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022: श्रीलंकेने अखेर संघाची केली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Sri Lanka Team: श्रीलंकेने अखेर आशिया कप 2022 साठी आपला संघ जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: श्रीलंकेने अखेर आशिया कप 2022 साठी आपला संघ जाहीर केला आहे. 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळून श्रीलंका या बहुराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात करेल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपल्या संघाची घोषणा याआगोदरच केली होती, श्रीलंका हा आपला संघ जाहीर करणारा शेवटचा संघ ठरला आहे. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत करण्यात येणार होते, परंतु देशात सुरु असलेल्या आर्थिक संकटामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या आयोजनापासून फारकत घेतली, त्यानंतर आता ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जात आहे.

दरम्यान, श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट बोर्डाने आशिया कप 2022 साठी 20 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. दासुन शनाका (Dasun Shanaka) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

आशिया चषक 2022 साठी श्रीलंकेचा संघ - दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, बानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजया डी सिल्वा, वानिदू हसरंगा, महेश थेक्षना, जेफ्री चॅव्हेरी, जेफ्री चॅविरे, महेश ठेक्शाना, बिनुरा फर्नांडो, चमिका फर्नांडो, मदुशांका, मथिशा पाथिराना, दिनेश चांडीमल, नुवानिंदू फर्नांडो आणि कसून राजिता.

आशिया कप 2022 पूर्ण वेळापत्रक

  • पहिला सामना - 27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबई

  • दुसरा सामना - 28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबई

  • तिसरा सामना - 30 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजा

  • चौथा सामना - 31 ऑगस्ट - क्वालिफायर विरुद्ध भारत - दुबई

  • सामना 5 - 1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबई

  • 6 वा सामना - 2 सप्टेंबर - क्वालिफायर विरुद्ध पाकिस्तान - शारजा

  • सामना 7 - 3 सप्टेंबर - B1 विरुद्ध B2 - शारजाह

  • सामना 8 - 4 सप्टेंबर - A1 वि A2 - दुबई

  • सामना 9 - 6 सप्टेंबर - A1 विरुद्ध B1 - दुबई

  • सामना 10 - 7 सप्टेंबर - A2 विरुद्ध B2 - दुबई

  • 11 वा सामना - 8 सप्टेंबर - A1 विरुद्ध B2 - दुबई

  • सामना 12 - 9 सप्टेंबर - B1 वि A2 - दुबई

  • अंतिम सामना - 11 सप्टेंबर - 1ला सुपर 4 विरुद्ध दुसरा सुपर 4 संघ - दुबई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT