Sri Lanka Dainik Gomantak
क्रीडा

अखेर शिक्कामोर्तब झालं! श्रीलंका खेळणार World Cup 2023, पण वानखेडेवरच भारताला भिडणार?

Sri Lanka Cricket: श्रीलंका संघ भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Pranali Kodre

Sri Lanka Qualified for ICC Cricket World Cup 2023: वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेतील सुपर सिक्समध्ये श्रीलंका क्रिकेट संघाने रविवारी यजमान झिम्बाव्वेविरुद्ध 9 विकेट्सने मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबरच श्रीलंकेने अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे. त्याचमुळे भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेची पात्रताही श्रीलंकेने मिळवली आहे.

त्यामुळे आता श्रीलंका वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळणारा 9 वा संघ ठरला आहे. आता या स्पर्धेसाठी केवळ एक जागा बाकी आहे. त्यासाठी झिम्बाब्वेसह स्कॉटलंड आणि नेदरलँड्स शर्यतीत आहेत.

बारा वर्षांनी वानखेडेवर होऊ शकते लढत

वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ क्वालिफायर स्पर्धेतून पात्रता मिळवणाऱ्या एका संघाशी 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे, तर दुसऱ्या संघाशी बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियवर खेळणार आहे.

दरम्यान, श्रीलंकेने जरी वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवली असली तरी अद्याप क्वालिफायरचा अंतिम सामना होणे बाकी आहे, त्यामुळे श्रीलंका वर्ल्डकप 2023 मध्ये जाणारा पहिला पात्र संघ ठरतो की दुसरा पात्र संघ ठरणार, याचा निर्णय होणे बाकी आहे. त्याचमुळे भारतीय संघाचा श्रीलंकाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर किंवा एम चिन्नास्वामी स्टेडियवर सामना होणार हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे.

कारण 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2 एप्रिल 2011 रोजी भारत आणि श्रीलंका संघात वानखेडे स्टेडियमवरच वर्ल्डकप 2011 स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

श्रीलंकेचा सोपा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करताना 32.2 षटकात 165 धावांवर सर्वबाद झाला. झिम्बाब्वेकडून सीन विलियम्सने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली, तर सिकंदर रझाने 31 धावा केल्या. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

श्रीलंकेकडून महिश तिक्षणाने 4 विकेट्स घेतल्या, तसेच दिल्शान मदुशनकाने 3 विकेट्स घेतल्या, तर मथिशा पाथिरानाने 2 विकेट्स आणि कर्णधार दसून शनकाने 1 विकेट घेतली.

त्यानंतर श्रीलंकेने 166 धावांचे आव्हान 33.1 षटकात 1 विकेट गमावत सहज पूर्ण केले. श्रीलंकेकडून पाथम निसंकाने 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तसेच दिमुथ करुणारत्नेने 30 धावांची खेळी केली, तर यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडिसने 25 धावांची नाबाद खेळी केली. दिमुथची एकमेव विकेट झिम्बाब्वेकडून रिचर्ड एगरावाने घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT