Sports Shoes  
क्रीडा

भारतीयांचा कल फिटनेसकडे; दोन वर्षात चार कंपन्या मालामाल, उत्पन्नात 6 हजार कोटींची वाढ

Sports Brand Sale: गेल्या काही काळात आरोग्याबाबत जागरुकता वाढल्याने स्पोर्ट्स ब्रँड्सलाही मोठा भाव मिळायला लागला आहे.

Pranali Kodre

Sports Brand Sale in India:

गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण जगच कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यातही साधारण तीन वर्षांपूर्वी जवळपास संपूर्ण जग याच संकटामुळे ठप्प झालं होतं. पण याच कालावधीत लोकांचा आरोग्याकडे, तंदुरुस्त राहण्याकडे, प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे कल वाढला.

त्याचमुळे त्यादृष्टीने लोकांच्या जीवनशैलीतही काही बदल झाले, ते जाणवण्यासारखे होते. या बदलांमुळे अनेक स्पोर्ट्स ब्रँड्सला भारतातही मोठा भाव मिळाला.

गेल्या दोन वर्षात भारतातही स्पोर्ट्स शुज, व्यायामाची साधणे, योगा मॅट्स, अशा अनेक साधनांची मागणी वाढली. त्यामुळे स्पोर्ट्सच्या दृष्टीने साधणे बनवणाऱ्या कंपन्यांना जवळपास दुप्पट फायदाही झाला.

द इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पुमा, डेक्थालॉन, आदिदास, स्केचर्स आणि एसिक्स अशा स्पोर्ट्स ब्रँड असलेल्या कंपन्यानी अर्थिक वर्ष 2021 पासून जवळपास 35-60 टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

साल 2021 मध्ये या कंपन्यांचे एकूण उत्पन्न 5022 कोटी रुपये होते. तर या कंपन्यांच्या रजिस्ट्रारकडून मिळालेल्या नियामक फाइलिंगनुसार अर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण महसूल 11617 कोटी इतका होता. म्हणजेच गेल्या दोन वर्षात उत्पन्नात तब्बल 6 हजार कोटींपेक्षाही अधिक उलाढाल झाली आहे.

पुमाच्या हेड ऑफ मार्केटिंग पद सांभाळणाऱ्या श्रेया सचदेव यांनी द इकोनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार तंदुरुस्ती आणि आरोग्याबद्दल जागरुकता वाढल्याने लोक चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या फुटवेअरच्या शोधात असतात.

रनिंग त्यांच्यासाठी सर्वाधिक वाढणारा विभाग ठरला आहे. तसेच 45 वर्षांहून अधिकच्या वयासाठी वॉकिंग शुजबाबतही शोध सातत्याने सुरू असतो.

एकूणच आता लोक आरोग्याबद्दल जागरुक झालेले दिसत आहेत. इतकेच नाही, तर कोविडनंतर लाईफस्टाईलमध्येही बदल झालेला दिसून आला असून काहीसा स्पोर्टिंग लूक करण्याकडेही अनेकांचा कल दिसून येत आहे. त्याचमुळे अनेक कंपन्यांमध्येही लोक कॅज्युअल लूकमध्ये दिसून येत आहेत.

स्पोर्ट्स ब्रँड्सचा गेल्या दोन वर्षातील महसूल

  • पुमा

    • 2021-22 वर्ष - 2,044 कोटी

    • 2022-23 वर्ष - 2,980 कोटी

  • डेक्थालॉन

    • 2021-22 वर्ष - 2,936 कोटी

    • 2022-23 वर्ष - 3,955 कोटी

  • आदिदास

    • 2021-22 वर्ष - 1,551 कोटी

    • 2022-23 वर्ष - 2,578 कोटी

  • एसिक्स

    • 2021-22 वर्ष - 252 कोटी

    • 2022-23 वर्ष - 345 कोटी

  • स्केचर्स

    • 2021-22 वर्ष - 936 कोटी

    • 2022-23 वर्ष - 1,759 कोटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT