Luis Enrique Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022 मधील एक्झिट लागली जिव्हारी! स्पेनच्या प्रशिक्षकांचा धक्का देणारा निर्णय

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत स्पेनला बाहेर पडावे लागल्यानंतर प्रशिक्षकांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Pranali Kodre

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. यात काही बलाढ्य संघांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीआधीच संपुष्टात आले. यात स्पेन संघाचाही समावेश आहे. दरम्यान, याचा परिणाम म्हणून स्पेनचे प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एन्रिक हे बार्सिलोना क्लबचे माजी प्रशिक्षक असून त्यांनी 2018 मध्ये स्पेनच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. पण आता त्यांनी ही जबाबदारी सोडली असल्याने स्पेन फुटबॉल फेडरेशनने आता लुईस द ला फ्लुएन्ते यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. लुईस द ला फ्लुएन्ते हे स्पेनच्या 21 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते.

(Spain Manager Luis Enrique resigned after team exit from FIFA World Cup 2022)

स्पेनचा मोरोक्कोकडून पराभव

स्पेनला उपउपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभवाचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे स्पेनकडून एकाही खेळाडूला पेनल्टी शुटआऊटमध्ये गोल नोंदवता आला नव्हता. या सामन्यात निर्धारित वेळेनंतर 0-0 अशी बरोबरी झाली होती.

त्यानंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये निकाल लागला. पण, यात मोरोक्कोने तीन गोल योग्य मारले. मात्र बलाढ्य स्पेन संघाला यात अपयश आले आणि त्यांचे फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

विशेष म्हणजे या स्पर्धेत युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण असलेल्या स्पेनला 4 सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यांनी कोस्टारिकाला 7-0 अशा मोठ्या गोलफरकाने पराभूत केले होते.

पण नंतर त्यांना जर्मनीविरुद्ध 1-1 ने बरोबरीत समाधान मानावे लागले, तर जपानविरुद्ध त्यांचा 1-2 अशा फरकाने पराभव झालेला. पण त्यांना पहिल्या सामन्यात 7 गोल केल्याने अंतिम 16 जणांच्या संघात पोहचण्यात या गोलफरकाचा फायदा झाला होता. पण, स्पेनला अंतिम 16 संघांमधून अंतिम 8 संघांमध्ये पोहचण्यात अपयश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT