South Africa vs India X/BCCI
क्रीडा

SA vs IND, 2nd Test: टीम इंडियात दोन बदल, जडेजासह 'या' खेळाडूला संधी, पाहा प्लेइंग-11

South Africa vs India: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India 2nd Test at Cape Town, Playing XI:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (३ जानेवारी) सुरु होत आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रविंद्र जडेजाला आर अश्विनच्या जागेवर संधी देण्यात आली आहे, तर शार्दुल ठाकूरच्या जागेवर मुकेश कुमारला संधी दिली आहे. शार्दुलच्या खांद्याला सरावादरम्यान दुखापत झाली होती. या दोन बदलांव्यतिरिक्त कोणताही मोठा बदल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये झालेला नाही.

या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डीन एल्गार करत आहे. हा त्याचा कारकिर्दीतील अखेरचा सामनाही आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार तेंबा बाऊमाला दुखापत झाल्याने तो या सामन्यातून बाहेर झाला, त्याचमुळे एल्गारला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, प्लेइंग इलेव्हनमध्ये बाऊमाच्या जागेवर ट्रिस्टन स्टब्सला संधी दिली आहे. त्यामुळे स्टब्स या सामन्यातून पदार्पणही करत आहे.

तसेच गेराल्ड कोएत्झी दुखापतग्रस्त असल्याने या सामन्याला मुकला आहे. त्याच्या जागेवर लुंगी एन्गिडीला संधी दिली आहे. याशिवाय केशव महाराजलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका आघाडीवर

या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचमुळे दुसरा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका जिंकण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी आहे. तसेच भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी नसली, तरी दुसरा सामना जिंकून बरोबरी साधत मालिका वाचवण्याची संधी आहे.

प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार

  • दक्षिण आफ्रिका - डीन एल्गार (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एन्गिडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT