India vs South Africa | Centurion Test BCCI
क्रीडा

SA vs IND, Test: रोहित-विराटचे कमबॅक, तर तिघांचे पदार्पण, असे आहेत पहिल्या कसोटीसाठी 'प्लेइंग-11'

Boxing Day Test: भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, Playing XI:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारपासून (26 डिसेंबर) चालू झाली असून या मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे कसोटी आहे. सेंच्युरियनला होत असलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचे कसोटी पदार्पण झाले आहे. तो भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 309 वा खेळाडू ठरला आहे. तसेच या सामन्यातून विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

त्याचबरोबर रविंद्र जडेजाला सकाळी पाठीमध्ये वेदना जाणवल्या असल्याने आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाज म्हणून संधी देण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रिका संघातही कर्णधार तेंबा बाऊमाचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, मार्को यान्सिन यांचेही पुनरागमन झाले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गर आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांचे कसोटी पदार्पण झाले आहे. ते दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी पदार्पण करणारे 357 आणि 358 वे खेळाडू ठरले आहेत.

आमने-सामने आकडेवारी

या सामन्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 42 कसोटी सामने खेळवण्यात आले असून 15 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 17 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तसेच 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

  • दक्षिण आफ्रिका - डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेंबा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT