Team India BCCI
क्रीडा

SA vs IND: पहिल्या कसोटीत कोणाला मिळू शकते प्लेइंग-11 मध्ये संधी? कुठे अन् कसा पाहाणार सामना, जाणून घ्या सर्वकाही

South Africa vs India, 1st Test: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या सामन्याला मंगळवारी सुरुवात होणार असून हा सामना कुठे पाहाता येईल जाणून घ्या.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test at Centurion, Predicted Playing XI, Live Streaming Details:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला मंगळवारी (२६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनला खेळला जाणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल.

दरम्यान, या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने प्लेइंग इलेव्हनबाबद महत्त्वाची माहिती दिली आहे.

रोहित शर्माने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची जागा निश्चित असल्याचे संकेत देताना प्रसिध कृष्णा किंवा मुकेश कुमार यांच्यातील एकाला संधी मिळेल, असे म्हटले आहे. तसेच त्याने असेही म्हटले आहे की 75 टक्के संघ निश्चित आहे.

त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल. याव्यतिरिक्त रोहितने प्लेइंग इलेव्हनबाबत फार माहिती दिलेली नाही.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदतगार असते, ही गोष्ट लक्षात घेता शार्दुल ठाकूरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. याशिवाय फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनच्या आधी रविंद्र जडेजाला संधी दिली जाऊ शकते. जडेजाकडे फलंदाजीचे कौशल्य तर आहेत, परंतु तो डावखुरा असल्याने त्याला अधिक पसंती दिली जाऊ शकते.

त्याचबरोबर रोहित यशस्वी जयस्वालबरोबर सलामीला फलंदाजीला उतरताना दिसू शकतो, तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

विराट कोहली त्याच्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मधली फळी सांभाळू शकतात. दरम्यान केएल राहुल मधल्या फळीतील फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळू शकतो.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा/मुकेश कुमार.

किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियनला होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील पाचही दिवसांच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.

कुठे पाहाणार कसोटी मालिका?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहाता येणार आहेत. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या मालिकेचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT