India vs South Africa BCCI
क्रीडा

SA vs IND: पहिल्या वनडेवर पडणार पावसाचे पाणी? काय आहेत जोहान्सबर्गमधील हवामान अंदाज, वाचा

India vs South Africa, 1st ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी जोहान्सबर्गला खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st ODI at Johannesburg, Weather Updates:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी20 मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. आता या टी२० मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. 

वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी, १७ डिसेंबर २०२३ रोजी खेळला जाणार आहे. हा सामना जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळला जाणार आहे.

टी२० मालिकेवेळी पावसाचा सामन्यांमध्ये अडथळा आला होता. त्यामुळे वनडेतही पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

दरम्यान, रविवारी जोहान्सबर्गमध्ये दिवसा पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. दिवसभर काही प्रमाणात ढगाळ वातावरण असेल, पण पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. Accuweather च्या रिपोर्टनुसार दिवसा तापमान साधारण २९ डिग्री सेल्सियस असेल, तर रात्री जवळपास १७ डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. त्यामुळे हा सामना पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वर्ल्डकप २०२३ नंतरची ही दोन्ही संघांची पहिलीच वनडे मालिका आहे. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडून नवे चेहरे या मालिकेत खेळताना दिसू शकतात.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

  • दक्षिण आफ्रिका - एडन मार्करम (कर्णधार), ओटनियल बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रिझा हेन्ड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन डर ड्युसेन, काईल वेरेयन, लिझार्ड विल्यम्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT