South Africa AFP
क्रीडा

SA vs IND: द. आफ्रिकेला तगडा धक्का! धाकड वेगवान गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, कारणही आले समोर

Gerald Coetzee: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला महत्त्वाचा वेगवान गोलंदाज संघाबाहेर झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

Pranali Kodre

South Africa pacer ruled out of Cape Town Test against India:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून अखेरचा कसोटी सामना अद्याप बाकी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊनला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने सांगितले आहे की दुखापतीची खबरदारी म्हणून कोएत्झीला संघातून मुक्त करण्यात आले आहे.

सेंच्युरियनला भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान कोएत्झीला ओटीपोटात अस्वस्थता जाणवत होती. त्याचे 29 डिसेंबर रोजी स्कॅन करण्यात आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून त्याला केपटाऊन कसोटीन न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्याऐवजी बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही.

दरम्यान, भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेच्या गुणतालिकेतही दक्षिण आफ्रिकेने या विजयासह अव्वल स्थान मिळवले आहे.

डीन एल्गार कर्णधार

कोएत्झी बाहेर जाण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार तेंबा बाऊमाही दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याला पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्याचमुळे त्याला पहिल्या कसोटीत नंतर सहभागी होता आले नव्हते. त्या सामन्यात डीन एल्गारने प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.

दरम्यान आता बाऊमा दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्याने एल्गारला दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार केले आहे. विशेष म्हणजे एल्गारचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना देखील आहे. या सामन्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

  • दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गार (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, मार्को यान्सिन, केशव महाराज, एडेन मार्करम, विआन मुल्डर, लुंगी एन्गिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT