Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ''भारताने वर्ल्ड कप जिंकला तर कपड्यांशिवाय...,'' साउथच्या अभिनेत्रीचं फायनलपूर्वी अनोखं प्रॉमिस

World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काही जण टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, तर काहींनी त्यांचे पब्लिसिटी स्टंट सुरु केले आहेत. एका बिर्याणी विक्रेत्याची बातमी होती की, भारत जिंकला तर तो मोफत बिर्याणी देईल.

दरम्यान, आता एका साउथ अभिनेत्रीची जोरदार चर्चा होत आहे. तिने एकदम हटके प्रॉमिस देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

कोण आहे ती अभिनेत्री?

पूनम पांडेने 2011 मध्ये प्रॉमिस दिले होते की, जर भारताने (India) वर्ल्ड कप जिंकला तर ती न्यूड (कपड्यांशिवाय) फोटोशूट करेल. आता त्याच धर्तीवर तेलुगू अभिनेत्री रेखा बोज हिने ओपन ऑफर दिली आहे.

ती म्हणाली की, टीम इंडियाने 2023 चा वर्ल्ड कप जिंकला तर ती विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर कपड्यांशिवाय फिरेल. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.

जर आपण रेखा बोजच्या इंस्टाग्राम बायोवर नजर टाकली तर तिने स्वतःची ओळख तेलुगू अभिनेत्री आणि सोशल मीडिया इंफ्लुएन्सर म्हणून केली आहे.

सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

दरम्यान, या पोस्टनंतर तेलगू अभिनेत्रीची खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी या पोस्टचा आनंद घेतला आणि तिकीट बुक करत असल्याचे सांगितले. तर अनेकांनी हे केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेले नाटक असल्याचे स्पष्टपणे लिहिले.

एका युजरने लिहिले की, अभिनेत्रीने टीम इंडियाच्या नावाचा वापर फक्त हेडलाइन्स बनवण्यासाठी केला आहे, जे खूप लज्जास्पद आहे. अशा घोषणा वारंवार होत असतात. अलीकडेच एका अभिनेत्री मॉडेलने मोहम्मद शमीसमोर (Mohammed Shami) लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

एका पाकिस्तानी अभिनेत्रीने विश्वचषकादरम्यान बांगलादेश संघाला प्रॉमिस दिले होते की, जर त्यांनी भारताला हरवले तर ती एका बंगाली मुलासोबत फिश डिनरसाठी जाईल. अशा ऑफर काही नवीन नाहीत.

अहमदाबादमध्ये आमने-सामने येणार

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या या मोठ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघ अहमदाबादला पोहोचले आहेत. रविवारी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.

20 वर्षांनंतर दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. 2003 मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते. आयसीसी नॉकआऊटमधील दोन्ही संघांमधील हा 7 वा सामना असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT