Sourav Kothari wins billiards at Petroleum Sports Board Dainik Gomantak
क्रीडा

पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत सौरव कोठारीला 'बिलियर्डस' विजेतेपद

अंतिम लढतीत त्याने ‘बीपीसीएल’च्या मनन चंद्रा याच्यावर 3 -1 फरकाने विजय नोंदविला.

किशोर पेटकर

Goa Sports Update: पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या बिलियर्डस स्पर्धेत व्यावसायिक खेळाडूंच्या वैयक्तिक गटात यजमान ‘ओएनजीसी’च्या सौरव कोठारीने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्याने ‘बीपीसीएल’च्या मनन चंद्रा याच्यावर 3 -1 फरकाने विजय नोंदविला. (Sourav Kothari wins billiards at Petroleum Sports Board)

मिरामार (Miramar) येथील क्लब टेनिस द गास्पार डायस येथे शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत कोठारीने पहिल्या गेममध्येगुणांचा ब्रेक नोंदविला. नंतर दुसरा गेम त्याने 00-30 फरकाने जिंकला. मननने तिसरा गेम 100-56 असा जिंकत चुरस निर्माण केली. चौथ्या गेममध्ये सौरवने 50 व 48 गुणांचा ब्रेक नोंदवत विजेतेपद प्राप्त केले. ब्राँझपदकाच्या लढतीत ‘ओएनजीसी’च्या ध्रुव सितवाला याने ‘बीपीसीएल’च्या (BPCL) क्रिश गुरबक्षानी याला 2-1 असे हरविले.

बिगरव्यावसायिक बिलियर्डस गटात आयओसीएलच्या आरिफ अख्तरने अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत त्याने ऑईल इंडियाच्या सौमेन याला 194 -84 असे हरविले. दुसऱ्या उपांत्य लढतीत ‘आयओसीएल’च्या अमरिश कमलापुरी याने सहकारी तसरिक हक याच्यावर 141-131 अशी मात केली.

सांघिक बिलियर्डस विजेतेपदासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (Indian Oil Corporation) आणि ओएनजीसी यांच्या अंतिम लढत होईल. उपांत्य लढतीत आयओसीएलने बीपीसीएल संघाला नमविले. ओएनजीसी संघाने ऑईल इंडियावर मात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT