Narendra Modi's Website Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील न ऐकलेल्या कथांवर एक नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी या वेबसाईटची माहिती दिली. विशेष म्हणजे या वेबसाईटला 'मोदी स्टोरी' असे नाव देण्यात आले आहे. या स्टोरीमध्ये त्या सर्व लोकांच्या आठवणी आहेत, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे जीवन जवळून पाहिले आहे. (Launch of website for unheard of things in the life of Prime Minister Modi)
दरम्यान, केंद्रीय मंत्री म्हणाले की, ''वेबसाईटमध्ये अशा अनेक लोकांचा सहभाग आहे, जे पंतप्रधानांना कधी भेटले आहेत किंवा त्यांच्यासोबत काम केले आहे. या वेबसाइटवर अनेक लेख, फोटो, ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअल देखील आहेत, जे पीएम मोदींच्या जीवनातील त्या अविस्मरणीय क्षणांवर प्रकाश टाकतात, ज्यांची बहुतेक लोकांना माहिती नाही.''
शिवाय, गुजरातमधील डॉ. अनिल रावल यांनी लिहिले आहे की, "1980 मध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान, जेव्हा त्यांनी विचारले की तुम्हाला समाजातील वंचित लोकांच्या उन्नतीसाठी कशामुळे प्रेरणा मिळाली, तेव्हा त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका स्वयंसेवकाच्या घरी जेवल्याची आठवण करून दिली. तेथे त्यांना बाजरीची रोटी आणि एका भांड्यात दूध देण्यात आले. त्यांच्या शेजारी त्याचा मुलगा दुधाची वाटी बघत होता. सगळा प्रकार लक्षात येताच मोदींनी भाकरी खाल्ली आणि दूध बाजूला केले. नंतर त्या मुलाने एकाच दमात सर्व दूध प्यायले. रावल यांच्या म्हणण्यानुसार, मोदी म्हणाले की, तेव्हापासून त्यांनी गरीबांसाठी जीवन समर्पित करण्याचे व्रत घेतले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.