Virat Kohli & Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli 100th Test: 'विराट अचानक कसा बदलला'

दैनिक गोमन्तक

टीम इंडिया (Team India) जेव्हा मोहालीत श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यासाठी जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा विराट कोहलीसाठी तो क्षण खूप खास असणार आहे. खरंतर मोहालीत विराट कोहलीचे स्वप्न साकार होणार आहे. विराट कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 100 वा कसोटी सामना खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. यातच आता विराट कोहलीचे (Virat Kohli) हे स्वप्न आता पूर्ण होत आहे. कोहलीच्या 100 व्या कसोटीपूर्वी, 50 टक्के प्रेक्षकांमध्ये तो मोहालीत खेळायला येणार असल्याचीही आनंदाची बातमी आली आहे. पहिल्या मोहाली कसोटीत प्रेक्षकांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु बीसीसीआयचे (BCCI) प्रमुख सौरव गांगुली यांनी त्यात बदल केला आहे. तसेच विराट कोहलीच्या 100 व्या कसोटीपूर्वी सौरव गांगुलीनेही एक मोठी गोष्ट सांगितली आहे. (Sourav Ganguly Said The 100thTest Is An Unforgettable Moment For Virat Kohli)

दरम्यान, गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला, 'विराट कोहलीसाठी 100 वी कसोटी हा खरोखरच कधीही न विसरता येणारा क्षण असेल. यासोबतच या दिग्गज खेळाडूचा शतकांचा दुष्काळही लवकरच संपेल.'

सौरव गांगुली माध्यमाशी टाईम्सशी बोलताना म्हणाला, ''विराट पुनरागमन करुन शतक झळकावेल. मला माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून तो शतक झळकावलेले नाही. परंतु तो एक महान खेळाडू आहे. विशेष म्हणजे तो लवकरच शतक करण्याची कसरही भरुन काढेल. त्याला शतक कसं करायचं हे माहीत आहे, अन्यथा तो 70 शतकंही करु शकला नसता. मला माहित आहे की, तो लवकरच मोठी धावसंख्या उभारणार आहे.''

विराट कोहली 100 वी कसोटी खास बनवणार?

गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला शतकांचा दुष्काळ तो शंभराव्या कसोटीत पूर्ण करेल, अशी आशा विराट कोहलीच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने आपल्या 100 व्या कसोटीत शतक झळकावलेले नाही. रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियासाठी, इंझमाम आणि जावेद मियांदादने पाकिस्तानसाठी ही कामगिरी केली आहे. नुकतेच जो रुटने आपल्या 100 व्या कसोटीत शतक झळकावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT