Sourav Ganguly | Rohit Sharma BCCI
क्रीडा

Rohit Sharma: 'रोहितला करायची नव्हती टीम इंडियाची कॅप्टन्सी, पण मग...', गांगुलीचा मोठा खुलासा

Sourav Ganguly: रोहित शर्मा भारतीय संघाचे सर्व प्रकारात नेतृत्व करण्यास आधी तयार नव्हता, याबद्दल सौरव गांगुलीने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Sourav Ganguly revealed Rohit Sharma wasn't keen to take Team India captaincy after Virat Kohli left it:

भारतीय क्रिकेट संघाने सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत तरी 8 सामन्यांपैकी 8 सामने भारताने जिंकले आहेत.

दरम्यान, भारतीय संघाच्या पूर्ण वेळ नेतृत्वाची जबाबदारी घेऊन आता रोहितला जवळपास 3 वर्षे होतील. त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

मात्र, रोहित जरी आत्ता कर्णधार असला, तरी ही जबाबदारी घेण्यास तो पूर्वी तयार नव्हता, याबद्दल मोठा खुलासा भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने केला आहे.

विराट कोहलीने 2021 टी20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या टी20 क्रिकेट संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. त्यानंतर रोहितकडे वनडे आणि टी20 संघाचे नेतृत्व सोपवले.

मात्र, त्यानंतर अचानक जानेवारी 2022 मध्ये विराटने भारताच्या कसोटी संघाचेही नेतृत्व सोडल्यानंतर रोहित कसोटीतही भारताचा कर्णधार झाला. या घटनांवेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली होता.

दरम्यान, आता गांगुलीने कोलकाता टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की 'सुरुवातीला रोहित भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्वाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हता. ही गोष्ट या स्टेजला गेलेली की मला त्याला सांगावे लागले की 'तू या जबाबदारीसाठी हो म्हण, नाहीतर मला सरळ घोषणा करावी लागेल.' कारण तो चांगला कर्णधार आहे.'

'विराट कोहली पायउतार झाल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी तोच योग्य होता. त्यामुळे मी जे आत्ता पाहात आहे, त्यामुळे मला आश्चर्य वाटत नाहीये.'

रोहितने आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सने नेतृत्व करताना संघाला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच रोहितने भारताचे नेतृत्व स्विकारल्यानंतर त्याच्यावर मोठी जबाबदारी येणार होती, त्याचे वेळापत्रक व्यस्त राहणार होते. याबद्दलही गांगुलीने प्रतिक्रिया दिली.

गांगुली म्हणाला, 'कसोटी, वनडे, टी20, आयपीएल; असे खूप क्रिकेट होते. तो आधीच आयपीएलमध्ये कर्णधार होता, त्याच्यावर बराच दबाव होता. त्यामुळे त्याचा ताटात खूप काही होते. पण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनण्यापेक्षा मोठे काहीच नाही. मला आनंद आहे की त्याने ही जबाबदारी घेतली आणि त्याचे परिणाम पाहूनही आनंद होत आहे.'

तथापि, भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड बाबतही गांगुलीने भाष्य केले. रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून 2021 टी20 वर्ल्डकपनंतर करार संपल्यानंतर द्रविडही ही जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हता. मात्र त्याने नंतर भारतीय क्रिकेटचा विचार करून ही जबाबदारी स्विकारल्याचे गांगुलीने सांगितले.

गांगुली म्हणाला, 'त्याचेही कुटुंब युवा आहे. त्याला दोन युवा मुलं आहेत. तसेच त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे प्रशिक्षक होणे सोपे नव्हते, पण त्याने भारतीय क्रिकेटचा विचार करून ती जबाबदारी घेतली. मी त्याला भविष्यासाठीही शुभेच्छा देतो.'

'प्रशिक्षकालाही वेळ देण्याची गरज असते, 3-4 महिन्यात जादू करून प्रशिक्षक परिणाम देऊ शकत नाही. त्यालाही गोष्टी बदलण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मला वाटते त्याने तो घेतला आणि आता त्याच्या जाबाबदारीचे हे दुसरे वर्ष आहे.'

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाबद्दल सांगायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत 102 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये भारताने 76 सामन्यात विजय मिळवले आहेत, तर 23 सामन्यात पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर 2 सामने अनिर्णीत राहिलेत, तर एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT