Dhruv Jurel | MS Dhoni | Souav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

Dhruv Jurel: 'धोनीला धोनी होण्यासाठी 15 वर्षे लागले, त्यामुळे...', जुरेलबद्दल बोलताना गांगुलीने स्पष्टच सांगितलं

Sourav Ganguly on Dhruv Jurel: ध्रुव जुरेलची एमएस धोनीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल सौरव गांगुलीने स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Pranali Kodre

Sourav Ganguly react on Dhruv Jurel's comparison to MS Dhoni

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान रांचीमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना पार पडला होता. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला होता. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतही 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, रांचीमध्ये मिळवलेल्या या विजयात युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने पहिल्या डावात नाबाद 90 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात शुभमन गिलबरोबर मॅचविनिंग 72 धावांची भागीदारी करताना नाबाद 39 धावा केल्या. त्याला या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकांची त्याची तुलना भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीशी केली आहे. माजी कर्णधार सुनील गावसकरांनीही म्हटले होते की जुरेलकडे धोनीप्रमाणे होण्याची क्षमता आहे. दरम्यान, सौरव गांगुलीने मात्र म्हटले आहे की त्याला अद्याप खेळू द्यावे.

गांगुली रेवस्पोर्ट्सशी बोलताना म्हटला, 'ध्रुव जुरेल, त्याने दबावाखाली एका कठीण खेळपट्टीवर त्याने काय कसोटी सामना खेळला. त्याच्यात खूप प्रतिभा आहे. तुम्ही मागे पडल्यानंतर पुनरागमन करणे कठीण असते.'

'एमएस धोनी हा वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे. जुरेलकडे प्रतिभा आहे, त्यात काही शंकाच नाही. पण एमएस धोनीला एमएस धोनी बनायला 20 वर्षे लागले. धोनीला धोनी होण्यासाठीही 15 वर्षे लागले. त्यामुळे जुरेलला खेळू द्या.'

'जुरेलकडे फिरकी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी खेळण्याची क्षमता आहे आमि महत्त्वाचे म्हणजे तो दबावाखाली खेळू शकतो. हेच तुम्ही एका युवा खेळाडूमध्ये पाहाता.'

बीसीसीआयच्या करारात येण्याची संधी

जुरेल सध्या 23 वर्षांचा आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. आता जर त्याने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळला, तर हा त्याचा भारताकडून तिसरा कसोटी सामना असेल.

त्यामुळे त्याला बीसीसीआयच्या 2023-24 करारामध्ये सी श्रेणीत सामील केले जाणार आहे. जर तो सी श्रेणीत सामील झाला, तर त्याला 2023-24 वर्षासाठी बीसीसीआयकडून 1 कोटी रुपये मिळू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Woman: 'त्या' रशियन महिलेचे गोव्यातही वास्तव्य, गुहेत दिला बाळाला जन्म; पती उद्योगपती असल्याचीही माहिती, अनेक खुलासे समोर

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

Goa Live News: गोव्याचे नवीन राज्यपाल २६ जुलै रोजी घेणार शपथ

Cricketer Retirement: क्रिकेट विश्वात एकच खळबळ! 'या' मॅचविनर ऑलराउंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT