Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

सौरव गांगुलीने महिला IPL बाबत दिले मोठे अपडेट, सांगितले कधी होणार आयोजन

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आता यावर एक मोठे अपडेट दिले असून यावेळी देखील मे महिन्यात पुन्हा एकदा महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

महिला टी-20 चॅलेंज ट्रॉफी सुरु झाल्यापासून अनेक दिग्गजांनी महिला आयपीएलची मागणी केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता यावर एक मोठे अपडेट दिले असून यावेळी देखील मे महिन्यात पुन्हा एकदा महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे (Womens Challengers Trophy) आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आगामी काळात महिला आयपीएलचेही (IPL) आयोजन करण्यात येणार असल्याचे गांगुलीने (Sourav Ganguly) स्पष्ट केले. यासोबतच टीम इंडिया (Team India) आगामी काळात आर टेस्ट मॅच खेळणार असल्याचेही त्याने सांगितले. (Sourav Ganguly Clarified That The Womens IPL Will Also Be Organized In The Near Future)

दरम्यान, भारतात, पुरुष क्रिकेटपटूंना कोणत्याही लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही, परंतु इतर देशांच्या T20 लीगमध्ये महिला नक्कीच आपले कौशल्य दाखवताना दिसतात. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) बीबीएलपासून ते न्यूझीलंडच्या (New Zealand) सुपर लीगपर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी पाहिले आहे.

महिला आयपीएल लवकरच होणार

भारतात महिलांच्या आयपीएलची अनेक दिवसांपासून मागणी होत होती, मात्र आजतागायत याबाबत कोणतीही ठोस योजना समोर आलेली नाही. आता बीसीसीआय अध्यक्षांनी याबद्दल एक मोठे अपडेट दिले. त्यांनी म्हटले, 'टीम इंडिया आगामी काळात कसोटी सामने खेळेल. आम्ही आयपीएलचे आयोजन करणार असून आगामी काळात आम्ही महिला आयपीएलचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करु. जेव्हा महिला खेळाडूंची संख्या वाढेल तेव्हा हे होईल.'' यंदाही महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन आयपीएल प्लेऑफ दरम्यान केले जाणार आहे.

महिला आयपीएलवर पहिले मोठे वक्तव्य देण्यात आले होते

गेल्या वर्षाच्या अखेरीस देखील सौरव गांगुलीने महिला आयपीएल लवकरच आयोजित केली जाईल, अशी आशा व्यक्त केली होती. क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांच्याशी खास बातचीत करताना ते म्हणाले, 'आम्ही महिला आयपीएलसंबंधी विचार करत आहोत. आम्ही त्या मसुद्यावर काम करत आहोत. येत्या तीन-चार महिन्यांत आम्ही याबाबत काय करणार असून ही स्पर्धा कशी आकाराला येईल ते लवकरच सांगू. मला वाटते की लवकरच महिला आयपीएल सुरु होईल आणि आम्ही परदेशी खेळाडूंनाही आमंत्रित करु. जेणेकरुन ते आमच्या देशांतर्गत खेळाडूंसोबत त्यांचा अनुभव शेअर करु शकतील.'

जय शाहनेही महिला आयपीएलबाबत आशा व्यक्त केली

त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. तो म्हणाला, 'महिला टी-20 चॅलेंजमध्ये चाहत्यांकडून खूप उत्साह होता. महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग आपल्या सर्वांना हवी आहे. परंतु असे नाही की तीन-चार संघ एकत्र करुन महिलांची आयपीएल सुरु करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT