Sourav Ganguly backed Virat Kohli and Rohit Sharma to feature in India squad for the T20I World Cup 2024
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी रविवारी (7 जानेवारी) बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंनाही संधी दिली आहे.
त्यामुळे रोहित आणि विराट यांचे 14 महिन्यांनी भारताच्या टी20 संघात पुनरागमन झाले आहे. त्यांनी भारताकडून अखेरचा टी20 सामना नोव्हेंबर 2022 मध्ये टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत खेळला होता. त्यानंतर हे दोघेही भारताकडून टी20 क्रिकेट खेळलेले नाहीत.
मात्र, आता त्यांचे पुनरागमन झाले असल्याने ते यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकपमध्येही खेळताना दिसू शकतात. विषेश म्हणजे रोहितकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. याबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही त्याचे मत व्यक्त केले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ घोषित होण्याआधीच गांगुलीने रोहित आणि विराटचे भारताच्या टी20 संघात पुनरागमन व्हायला हवे असे म्हटले होते. तसेच त्याने असेही म्हटले होते की टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये रोहितने नेतृत्व करायला हवे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार गांगुली म्हणालेला, 'टी20 वर्ल्डकपमध्ये नक्कीच रोहित शर्माने नेतृत्व करायला हवे. विराट कोहलीही संघात हवा. विराट हा शानदार खेळाडू आहे. जरी ते वर्षभराने पुनरागमन करत असले, तरी काही फरक पडणार नाही.'
याशिवाय यशस्वी जयस्वालनेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान प्रभावित केल्याचे गांगुलीने म्हटले आहे.
खरंतर गेल्या वर्षभरात रोहित आणि विराट यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या नियमितपणे भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. तसेच सूर्यकुमार यादवने उपकर्णधार पद सांभाळले होते. सध्या हार्दिक आणि सूर्यकुमार हे दोघेही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.