Sobhana Asha X/RCBTweets
क्रीडा

Sobhana Asha Video: W,W,W...एकाच ओव्हरमध्ये युपीला तीन धक्के देणाऱ्या शोभनाने RCB साठी 5 विकेट्स घेत रचला नवा इतिहास

Pranali Kodre

Sobhana Asha five wickets during RCB vs UPW WPL 2024 match

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा दुसरा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात २ धावांनी विजय मिळवला. बेंगलोरच्या या विजयाची शिल्पकार ठरली 32 वर्षीय शोभना आशा.

शोभनाने या सामन्यात 5 विकेट्स घेत नवा विक्रम रचला. या सामन्यात बेंगलोरने युपीसमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युपीला पहिला धक्का सोफी मोलीनेक्सने कर्णधार एलिसा हेलीला 5 धावांवरच बाद करत दिला होता.

त्यानंतर मात्र शोभनाने युपीच्या फलंदाजांना संघर्ष करायला लावला. तिने डावाच्या 9 व्या षटकात वृंदा दिनेशला आणि ताहलिया मॅकग्रा या खेळपट्टीवर स्थिरावलेल्या दोन खेळाडूंना बाद करत युपीला दुहेरी धक्के दिले.

यानंतरही ग्रेस हॅरीस आणि श्वेता सेहरावत यांनी अर्धशतकी भागीदारी करत युपीला विजयाच्या दिशेने नेले होते. परंतु, पुन्हा एकदा शोभनाची गोलंदाजी महत्त्वाची ठरली.

17 व्या षटकात तिने चेंडू हातात घेला आणि कमाल केली. तिने 31 धावांवर खेळणाऱ्या श्वेताला बाद केले. तिचा अप्रतिम झेल स्मृती मानधनाने घेतला.

त्यानंतर चौथ्या चेंडूवर शोभनाने ग्रेस हॅरिसला 38 धावांवर त्रिफळाचीत केले. तसेच शेवटच्या चेंडूवर तिने किरण नवगिरेलाही माघारी धाडले. त्यामुळे एकाच षटकात युपीने तीन विकेट्स गमावल्याने त्यांच्यासाठी विजय कठीण झाला. अखेर बेंगलोरने बाजी मारली आणि सामना जिंकत यंदाच्या हंगामाची विजयाने सुरुवात केली.

बेंगलोरच्या विजयाची शिल्पकार ठरलेल्या शोभनाने 4 षटकार 22 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.त्यामुळे ती डब्ल्युपीएलमध्ये 5 विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. यापूर्वी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला या स्पर्धेत 5 विकेट्स घेता आल्या नव्हत्या.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 157 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून रिचा घोषने 62 धावांची आणि शभ्भीनेनी मेघनाने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. युपीकडून राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीला 20 षटकात 7 बाद 155 धावा करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT