Smriti Mandhana  Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs AUSW: एक धाव काढण्याच्या नादात स्मृतीने गमावली विकेट; शतक पण हुकलं!

INDW vs AUSW: भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी सलामीवीर स्मृती मंदाना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात धावबाद झाली.

Manish Jadhav

INDW vs AUSW: भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी सलामीवीर स्मृती मंदाना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात धावबाद झाली. एकेरी धाव काढण्याच्या प्रयत्नात स्मृतीने आपली विकेट गमावली. यादरम्यान तिचे दुसरे कसोटी शतकही हुकले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला स्मृतीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र यामध्ये ती अपयशी ठरली. तिला गार्डनर आणि किम गर्थने वैयक्तिक 74 धावांवर धावबाद केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 219 धावांना उत्तर देताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे.

दरम्यान, भारतीय डावातील 39व्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्मृतीला धाव घ्यायची होती. स्मृतीने अॅशले गार्डनरचा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळला. यानंतर, तिला झटपट धावून धाव घ्यायची होती, मात्र किम गर्थने पटकन चेंडू गोलंदाजाच्या दिशेने फेकला आणि गार्डनरने तिला धावबाद करण्यास उशीर केला नाही. स्मृतीला 68 चेंडूत तिसरे अर्धशतक पूर्ण केले. 106 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 74 धावा करुन ती बाद झाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत मंदानाची कामगिरी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मंदानाची बॅट तळपली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 127 आणि 31 धावा केल्यानंतर आता तिने 74 धावांची इनिंग खेळली आहे. तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरच्या 4 बळी आणि स्नेह राणाच्या 3 बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळला. भारताने अलीकडेच आपल्या एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी घरच्या मैदानावर इंग्लंडचा पराभव केला.

मंदानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

स्मृती मंदाना भारतीय महिला क्रिकेट संघातील तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. तिने आतापर्यंत 80 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीतील सहावा कसोटी सामना खेळत आहे. मंदानाच्या नावावर वनडेमध्ये 3179 धावा आहेत तर टी-20 मध्ये 2998 धावा आहेत. मंदानाच्या नावावर वनडेमध्ये 5 शतके आहेत, तर तिने कसोटीत एक शतक झळकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'अशी मीटिंग झालीच नाही'! तवडकरांच्या विषयावरून प्रदेशाध्‍यक्षांचे कानावर हात; भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया

Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

SCROLL FOR NEXT