Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 चे शेड्यूल येताच RCB ने केली मोठी घोषणा, 'या' खेळाडूला बनवले कर्णधार

Royal Challengers Banglore: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL (IPL-2023) च्या आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Manish Jadhav

Royal Challengers Banglore Captain: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL (IPL-2023) च्या आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मोसमातील पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे. या लीगपूर्वी, भारतात प्रथमच महिला आयपीएल (WPL 2023 लिलाव) खेळली जाणार आहे. दरम्यान, आरसीबीने आपल्या संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

आरसीबीने या खेळाडूला कर्णधार बनवले

महिला आयपीएल (WPL 2023 ऑक्शन) लिलावात टीम इंडियाची (Team India) स्टार स्मृती मानधना हिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 3 कोटी 40 लाखांमध्ये त्यांच्या संघात समाविष्ट केले होते. स्मृती मानधानाला आता या संघाची कर्णधार बनवण्यात आली आहे.

विराट कोहली-फॅफ डुप्लेसी यांनी ही घोषणा केली

माजी फ्रँचायझी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि विद्यमान कर्णधार फाफ डुप्लेसी यांनी मानधनाची कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि फाफ डुप्लेसी यांनी कर्णधारपदाची घोषणा केली आहे.

टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक

26 वर्षीय स्मृती मानधानाने भारतासाठी आतापर्यंत 112 टी-20 सामने खेळले आहेत. स्मृतीने या सामन्यांमध्ये 27.33 च्या सरासरीने 2651 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, तिने टीम इंडियासाठी आतापर्यंत 77 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 42.68 च्या सरासरीने 3073 धावा केल्या आहेत. स्मृतीने 4 कसोटी सामन्यात 325 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम

स्मृती मानधना रु. 3.40 कोटी, ऋचा घोष रु. 1.90 कोटी, एलिस पेरी रु. 1.70 कोटी, रेणुका सिंग रु. 1.50 कोटी, सोफी डिव्हाईन रु. 50 लाख, हीदर नाइट रु. 40 लाख, मेगन शुट रु. 40 लाख, कनिका 3 लाख रु. निक्रिक 30 लाख, झरीन बर्न्स 30 लाख, प्रीती बोस 30 लाख, कोमल जंजाड 25 लाख, आशा शोभना राव 10 लाख, दिशा कासट 10 लाख, इंद्राणी राय 10 लाख, पूनम खेमनार 10 लाख, सहाना पवार 10 लाख, श्रेयंका पाटील 10 लाख रु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT